Share

सैफ अली खानच्या वडिलांशी होणार होते ‘या’ अभिनेत्रीचे लग्न; एका दु:खापासून आजही सावरू शकली नाही स्वत:ला

बॉलिवूडमध्ये सध्या एकपेक्षा एक अभिनेत्री आहेत. ज्यांच्या अदाकारीचे चाहते दिवाणे आहेत. अभिनेत्रीची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमी आतुर असतात. मात्र ७०-८० दशकातील अभिनेत्री देखील कमी नव्हत्या. त्यांनी देखील आपल्या अदाकारीने चाहत्यांना वेड लावले होते. अभिनेत्रीची एक झलक पाहण्यासाठी चाहते तिच्या चित्रपटाची वाट पाहत होते. अशीच अभिनेत्री ७०-८० च्या दशकात होती.

ती अभिनेत्री म्हणजे सिमी ग्रेवाल होय. सिमी यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे. मात्र त्या ‘रोंदेवू विद सिमी ग्रेवाल’ या चॅट शोमुळे चर्चेत आल्या होत्या. सिमी यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९४७ रोजी लुधियाना येथे झाला. माध्यमांच्या माहितीनुसार, सिमी यांना लहानपणापासूनच अभिनयाची खूप आवड होती. मात्र त्यांच्या कुटुंबीयांची इच्छा होती की, त्यांनी अगोदर आपले शिक्षण पूर्ण करावे. यासाठी कुटुंबाने सिमी आणि त्यांच्या बहिणीला लंडनला शिक्षणासाठी पाठवले होते.

त्यानंतर सिमी यांनी आपले स्वप्न पूर्ण केले. शिक्षण पूर्ण करताच त्यांनी चित्रपटांमध्ये पदार्पण केले. त्यांच्या कारकिर्दीतील ‘टारझन गोज टू इंडिया’ हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट १९६२ मध्ये आलेला होता. मात्र हा इंग्रजी चित्रपट होता. या चित्रपटात त्यांच्यासोबत फिरोज खान देखील मुख्य भूमिकेत होते. मात्र त्यांची खरी कारकीर्द ही हिंदी चित्रपटांतून सुरू झाली. सिमी यांना ‘तीन देवियां’ चित्रपटातून लोकप्रियता मिळाली. हा चित्रपट १९६५ मध्ये प्रदर्शित झाला होता.

तसेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, सिमी आणि क्रिकेटर मन्सूर अली खान पटौदी यांचे एकमेकांवर प्रेम होते. एकेकाळी यांच्यातील जवळीक ही चित्रपटसृष्टीत सामान्य होती. असे म्हटले जात होते की, पटौदी आणि सिमी यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. परंतु काही कारणास्तव त्यांचे लग्न होऊ शकले नाही. आपल्या माहितीच असेल की, क्रिकेटर मन्सूर अली खान पटौदी हे अभिनेता सैफ अली खानचे वडील होते.

त्याचबरोबर सिमी आणि मन्सूर अली खान पटौदी यांचे ब्रेकअप झाले होते. त्यानंतर सिमी यांनी दिल्लीत राहणारे रवी मोहन यांच्याशी लग्न केले. रवी मोहन हे एक बिझनेसमन आहेत. मात्र, त्यांचे हे नातेही फार काळ टिकले नाही. त्यानंतर सिमी आणि रवी यांचा घटस्फोट झाला. सिमी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘त्यांना अजूनही मुलं नसल्याचा त्रास आहे.’

त्याचबरोबर सिमी यांनी फक्त अभिनयातच नाही, तर दिग्दर्शनातही आपला हात आजमावला आहे. इतकेच नव्हे तर, त्यांनी दिग्गज चित्रपट निर्माते राज कपूर आणि पंतप्रधान राजीव गांधी यांची डॉक्युमेंट्री ही बनवली होती. त्यामुळे देखील सिमी ग्रेवाल चर्चेत आल्या होत्या.

 

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now