Share

सिल्व्हर ओक हल्ला! अटकेतील कर्मचाऱ्यांची परिस्थिती बिकट; जामिनासाठी पैसेही नाही

sharad pawar

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर झालेल्या आंदोलनानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. त्यानंतर संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे.  अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणींमध्ये आता आणखी वाढ होताना पाहायला मिळत आहे.

काल अॅड गुणरत्न सदावर्ते यांच्या घरात आढळलेल्या वस्तूंमुळे यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होणार असल्याचं दिसतं आहे. तर दुसरीकडे या हल्ल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत एसटीचे 115 कर्मचारी आहेत. अटक करण्यात आलेल्या 115 आरोपींपैकी 24 महिलांचा समावेश आहे.

दरम्यान, यावर 20 एप्रिल (आज) रोजी सुनावणी होणार आहे. अशातच कोठडीत असलेले एसटीचे 115 कर्मचाऱ्यांनी जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. या लोकांची आर्थिक परिस्थिती खूप बिकट असून त्यांच्यापैकी अनेकांकडे जामीनाची रक्कम भरण्यासाठी पैसे नसल्याच त्यांच्या जामीन अर्जात नमूद करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अटकेत असलेले अनेक जण हे मुंबई बाहेरचे असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच, सिल्व्हर ओकवरील हल्लाप्रकरणी न्यायालयाने मुंबई पोलिसांना येत्या 29 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे निर्देश दिले आहेत. या हल्ल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह 115 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.

दरम्यान, या हल्ल्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते हे चांगलेच चर्चेत आले आहेत. अॅड सदावर्ते यांच्या घरातून ताब्यात घेतलेल्या हिरव्या रंगाच्या रजिस्टरमध्ये 250 डेपोतून पैसे कसे गोळा करायचे याचा उल्लेख असल्याचा दावा सरकारी वकिल प्रदीप घरत यांनी केला आहे. यामुळे आता या प्रकरणाला वेगळेच वळण लागणार का? हे पाहणे महत्त्वाच ठरणार आहे.

जाणून नेमकं अॅड गुणरत्न सदावर्ते यांच्या घरात काय सापडले? सदावर्तेंच्या घरात काही संशयास्पद कागदपत्रं सापडली आहेत. एका रजिस्टरमध्ये एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे गोळा केल्याचा उल्लेख आहे. दरम्यान, घरत यांनी न्यायालयात दिलेल्या नव्या माहितीमुळे सदावर्तेंच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या
श्रीलंकेसारखी परिस्थिती होण्याआधी जनतेने धर्मांध राजकारण बाजूला सारावे; राष्ट्रवादीचे आवाहन
“सुप्रीया सुळेंबाबत धनंजय मुंडेंचे मत वाईट, लवकरच शरद पवारांना ‘ते’ रेकाॅर्डींग ऐकवणार”
मशिदींवरील भोंग्यांबाबत संजय राऊतांचं थेट मोदींना आवाहन; म्हणाले, ‘हिंमत असेल तर…’
बॉलिवूडवर शोककळा! अमिताभ बच्चनला स्टार बनवणाऱ्या दिग्दर्शकाचं दुःखद निधन

इतर क्राईम ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now