महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या स्पर्धेत पैलवान सिकंदर शेखचा सेमी फायनलमध्ये पराभव झाला होता. पण त्याच्यावर अन्याय झाल्याचे अनेकांनी म्हटले होते. त्याची लढत महेंद्र गायकवाडसोबत झाली होती. त्या सामन्याच्या गुणांवरुन आजही वाद सुरु आहे.
सोशल मीडियावर सध्या त्याचीच चर्चा सुरु आहे. अनेकांनी सोशल मीडियावर सिकंदरवर अन्याय झाल्याचे म्हणत त्याला पाठिंबा दिला आहे. तर काहींनी त्याच्यावर अन्याय न झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सिकंदर सोशल मीडियावर ट्रेंडिंगवर आहे.
पंचाच्या चुकीच्या निर्णयामुळे सिकंदर स्पर्धेतून बाहेर पडल्याचे म्हटले जात आहे. आता पुन्हा एकदा पत्रकारांनी त्याच्याशी या विषयावर संवाद साधला होता, त्यावेळी त्याने यावर प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, मी जनतेच्या मनातला महाराष्ट्र केसरी आहे.
महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते की, महाराष्ट्र केसरी स्पर्धेत टांग कुणी कुणाला मारली यावरुन सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. त्यामध्ये कुणी अंगाला माती लावलेली नाहीये, तर कुणी शड्डू ठोकलेला नाहीये.
तसंच माझं मत असं आहे की जे यामध्ये खेळतात. त्यांनीच यात बोलावे. आमच्या सारख्यांनी यात तोंडाची वाफ वाया घालवू नये, असेही अजित पवारांनी म्हटले होते. आता हा वाद शांत झाला असताना पुन्हा सिकंदरने यावर प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, जनतेच्या मनातील महाराष्ट्र केसरी मीच आहे.
मी महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेत हरलो असलो तरी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात माझ्याबद्दल प्रेम आहे. त्यामुळे स्पर्धेत हरलो असलो तरी जनतेच्या मनातील महाराष्ट्र केसरी मीच आहे, असे सिकंदर शेखने पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
शाहरूख जोमात बॉयकॉट गँग कोमात! पहिल्याच दिवशी पठाणची रेकॉर्डब्रेक कमाई, आकडा वाचून शाॅक व्हाल
मंत्रिमंडळात विस्तारात शिंदे गट अन् भाजपमधील ‘या’ नेत्यांची लागणार वर्णी, दिल्लीत झालं शिक्कामोर्तब?
मराठमोळ्या केदार जाधवची रणजी ट्रॉफीमध्ये दहशत, गोलंदाजांची धुलाई करत ठोकल्या 553 धावा