Share

सिकंदर शेखचे महाराष्ट्र केसरी जिंकण्याचे स्वप्न भंगले, लोक म्हणाले, त्याच्यावर अन्याय झाला कारण…

sikandar shaikh

sikandar shaikh lose maharashtra kesari  | पुण्यात सध्या महाराष्ट्र केसरीची स्पर्धा सुरू आहे. ती स्पर्धा जिंकण्यासाठी अनेक पैलवान वेगवेगळ्या गावांमधून स्वप्न घेऊन आले आहेत. पण या स्पर्धेत अनेकांचा पराभव झाला आहे, त्यामुळे त्यांचे स्वप्न भंगले आहे.

प्रसिद्ध पैलवान सिकंदर शेखचे स्वप्न आता भंगले आहे. सेमी फायनलमध्ये पोहचलेल्या सिकंदर शेखचा पराभव झाला आहे. महेंद्र गायकवाडसोबत सिकंदर शेखची लढत झाली होती. पण त्याचा त्या लढतीत पराभव झाला आहे. पण सिकंदरवर अन्याय झाल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

कुस्तीत महेंद्र गायकवाडने बाहेर लावलेल्या टांगेचा डाव बरोबर नव्हता. सिकंदर हा डेंजर पोझिशनमध्ये नव्हता. पण तरीही महेंद्रला चार गुण दिले गेले. त्यामुळे अनेकजणांनी हा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे. अनेकांनी सोशल मीडियावर याबाबत मत व्यक्त केलं आहे.

अनेकांनी पंचांनी घेतलेला हा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे. पण अखेर पंचांनी निर्णय दिल्यामुळे सिकंदर शेखचे स्पर्धेतून बाहेर झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न त्याचे भंगले आहे. पण त्याने घेतलेली मेहनत ही सर्वांसमोर एक नवा आदर्श उभा करणारी आहे.

दरम्यान, सिकंदरचे वडील हे हमाल होते, त्यांनी हमाली करून सिकंदरला मोठे केले आहे. खूप मेहनत घेऊन त्यांनी सिकंदरला कुस्ती सुद्धा शिकवली. कुस्ती खेळत असताना तो लष्करात भरती झाला. त्यानंतर सुद्धा त्याने कुस्तीचा नाद सोडला नाही आणि बक्षिसांनी आपली परिस्थितीच बदलून टाकली.

लष्करातही त्याने अनेक स्पर्धा जिंकल्या. त्याने कुस्तीत खूप बक्षिसे जिंकली आहे. त्याने आतापर्यंत एक महिंद्रा थार, एक ट्रॅक्टर, चार अल्टो कार, चोवीस बुलेट, सहा टीव्हीएस बाईक, सहा हिरो होंडाच्या बाईक आणि तब्बल ४० चांदीच्या गदा इतकी बक्षिसे जिंकली आहे.

महाराष्ट्र केसरी 2023 चा अंतिम सामना पुण्यात झाला. या स्पर्धेत अंतिम सामन्यात पुण्याच्या शिवराज राक्षेने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला चितपट करत  फायनल जिंकली. पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील असलेला शिवराज राक्षे ठरला आहे २०२३ चा महाराष्ट्र केसरी. त्यानंतर तुफान जल्लोश करण्यात आला.

त्याचबरोबर पहिल्या उपांत्य फेरीत मॅट विभागातील शिवराज राक्षे आणि दुसऱ्या उपांत्य फेरीत माती विभागातील महेंद्र गायकवाड यांनी बाजी मारली. त्यामुळे या दोन विजयी पैलवानांमध्ये अंतिम सामना रंगला होता. दोन्हीही पैलवान तुल्यबळ होते. तरीही अंतिम सामना खूपच एकतर्फी झाला. अवघ्या २ मिनिटाच्या आत शिवराज राक्षेने बाजी मारली.

महाराष्ट्र केसरीच्या दोनही उपांत्य फेरीच्या फेऱ्याही अतिशय रोमांचक होत्या. मॅट विभागात हा चुशीचा सामना पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शिवराज राक्षे आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांच्यात झाला. या चुरशीच्या लढतीत पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शिवराज राक्षे यांनी बाजी मारली.

महत्वाच्या बातम्या-
उर्फी जावेदला सार्वजनिक ठिकाणी अतरंगी कपडे घालून फिरण पडणार महागात, मुंबई पोलिसांनी पाठवली नोटीस
सिकंदर शेखचे महाराष्ट्र केसरी जिंकण्याचे स्वप्न भंगले, लोक म्हणाले, त्याच्यावर अन्याय झाला कारण…
शिवसेना, धनुष्यबाणाचा निर्णय शिंदे गटाच्या बाजूने लागला तर ‘हा’ असेल ठाकरे गटाचा प्लान बी

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now