पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला(Siddhu Moosewala) यांना मारण्यासाठी अत्यंत धोकादायक योजना तयार करण्यात आली होती. प्रत्यक्षात सिद्धू मुसेवालाला बाहेर नव्हे तर घरात घुसून मारण्याच्या तयारीत होते. त्यासाठी पूर्ण तयारी करण्यात आली होती पण शेवटच्या क्षणी चूक झाली.(sidhu-was-going-to-kill-musewala-by-breaking-into-the-house-but-due-to-this-the-plan-changed)
सर्व शूटर्स पोलिसांच्या(Police) वर्दित प्रवेश करणार होते आणि त्यासाठी पोलिसांची वर्दीही आली होती पण नेमप्लेट आणायला विसरले. नेमप्लेट नसल्यामुळे त्यांना गेटवरच पकडले जाईल, असे वाटले, त्यानंतर हा प्लॅन रद्द करण्यात आला.
या संपूर्ण प्रकरणात आणखी दोन शूटर्सना अटक करण्यात आली आहे. दिल्ली(Delhi) पोलिसांच्या स्पेशल सेलच्या अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली. या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा करताना दिल्ली पोलिसांचे विशेष सीपी एचजीएस धालीवाल यांनी सांगितले की, अंकित सिरसा आणि सचिन भिवानी यांना अटक करण्यात आली आहे.
या दोघांचा मुसेवाला यांच्या हत्येत सहभाग होता. धालीवाल यांनी एका खासगी वाहिनीशी बोलताना मारेकऱ्यांनी पोलिसांची वर्दी का मागितली हे स्पष्ट केले. धालीवाल यांनी सांगितले की, घरात घुसून मुसेवाला मारण्याची तयारी होती. त्यामुळेच पोलिसांचा ड्रेस देण्यात आला होता मात्र नेमप्लेट नसल्याने ही योजना बदलावी लागली.
धालीवाल म्हणाले की त्यांच्या अटकेसाठी, विशेष सेलचे पथक सतर्क होते आणि राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा, यूपी, झारखंड आणि एनसीआरच्या इतर ठिकाणी पाठपुरावा करत होतो. यापूर्वी तो दोन वेळा पळून जाण्यात यशस्वी झाला होता. हे दोघेही आंतरराज्यीय बसने येणार असल्याची माहिती होती, त्यामुळे त्यांच्यावर बारीक नजर होती.
धालीवाल यांनी सांगितले की, अंकित सिरसा(Ankit Sirsa) हा केवळ 19 वर्षांचा असून त्याने मूसवाला यांच्यावर दोन्ही हातांनी गोळीबार केला. मध्येच त्याचे एक शस्त्र जाम झाले, तरीही त्याने 14 ते 15 गोळ्या झाडल्या. यापूर्वीही काही घटनांमध्ये त्याचा सहभाग असून, त्याच्या गुन्ह्य़ाचा इतिहास तपासण्यात येत आहे. त्याला लवकरात लवकर अंडरवर्ल्डमध्ये(Underworld) नाव कमवायचे होते.