Share

सिद्धू मुसेवालाच्या कुत्र्यांनीही सोडले खाणेपिणे; मुक्या जीवाचा व्हिडीओ पाहून डोळ्यांत अश्रू येतील

प्रसिद्ध पंजाबी गायक शुभदीप सिंग उर्फ ​​सिद्धू मुसेवाला याच्या निधनानंतर आता त्याचे पाळीव कुत्रे शेरा आणि बघीरा यांनाही दु:ख झाले आहे. रविवारी संध्याकाळपासून शेरा आणि बघीरा या दोन पाळीव कुत्र्यांनी जेवण केले नाही. सिद्धू मुसेवाला याच्या जाण्याने ते प्रचंड उदास आहेत.

प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला याची रविवारी गोळी झाडून हत्या करण्यात आली. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. त्याच्या हत्येनंतर पंजाबच नाही तर इतर राज्यात देखील खळबळजनक वातावरण निर्माण झालं. त्याच्या चाहत्यांनी दुःख व्यक्त केले. त्याच्या निधनाने त्याचे पाळीव कुत्रे देखील उदास बसलेले फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

माहितीनुसार, दरवाजा थोडा जरी वाजला तरी सिद्धू मूसेवाला याची दोन पाळीव कुत्रे खडबडून उठतात, आणि सिद्धू मूसेवाला आला या आशेने दरवाजाकडे पाहतात. मात्र त्यांची आशा तुटते. सिद्धू मूसेवाला याला पाहण्यासाठी कधी घरच्या छतावर जातात, तर कधी रस्त्याकडे टक लावून पाहत बसलेले असतात.

सिद्ध मुसेवाला याची शस्त्रे आणि गाण्यांमधील ५९११ ट्रॅक्टरची आवड सर्वांनाच ठाऊक आहे. पण त्याला कुत्र्यांचीही प्रचंड आवड होती. त्याने २ कुत्रेही पाळले. ज्यांची नावे शेरा आणि बघीरा अशी ठेवण्यात आली होती. मुसेवाला याला कुत्र्यांची खूप आवड होती.

जेव्हा तो घरी असायचा त्याची ही दोन कुत्रे नेहमी त्याच्या आसपासच असायचे. तो शो किंवा शूट करायला गेला की त्याची वाट ही दोन कुत्रे बघत बसायचे. तो आल्यानंतर लगेच त्याच्या जवळ जाऊन त्याला चिकटत असायचे, त्याच्या आसपास फिरायचे.

मात्र आता चार दिवस होत आले, शेरा आणि बघीरा ही कुत्रे मुसेवाला यांच्या आवडत्या 5911 ट्रॅक्टरजवळ सतत उदास बसलेली दिसतात. हताश कुत्रे कुठेही बाहेर जाऊ नाहीत, त्यासाठी त्यांना बांधून ठेवलं आहे. मुसेवाला दिसत नाही यामुळे कुत्र्यांनी जेवण देखील बंद केले आहे. त्यांना दिलेले जेवण ताटात तसेच पडून राहते.

कधी कधी हे कुत्रे आवाज काढतात, आणि त्यांचा हा आवाज जणू मुसेवालासाठीच असतो, असे कुटुंबातील इतर लोकांना वाटते. मुसेवाला कुठे गेला, अशी त्याला हाक मारत असावेत असे त्यांना वाटते. शेरा आणि बघीरा या दोन्ही कुत्र्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मनोरंजन इतर

Join WhatsApp

Join Now