Share

सिद्धू मुसेवालाला काही मिनीटे आधीच झाला होता मृत्युचा आभास, कारमधील मित्राने सांगितला घटनाक्रम

पंजाबचे प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवालाच्या (Sidhu Musewala) हत्येपूर्वी घडलेल्या प्रकाराबाबत एक मोठी बाब समोर आली आहे. सिद्धूवर गोळ्या झाडायच्या आधी कारमध्ये ‘उठेगा जवानी विच जनाजा मिठिए’ हे गाणे वाजत होते. खुनाच्या वेळी सिद्धूसोबत कारमध्ये उपस्थित असलेल्या गुरविंदर सिंग (Gurwinder Singh) या मित्राने ही माहिती दिली.(Sidhu Musewala, Gurvinder Singh, Uthega Jawani Vich Janaja Mithiye, song)

सिद्धू याच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यात गुरविंदर सिंग हा देखील जखमी झाला असून त्याच्यावर सध्या लुधियाना येथील डीएमसी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुरविंदर सिंग हा सिद्धू खून प्रकरणातील महत्त्वाचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे कारण त्यावेळी कारमध्ये फक्त तो आणि सिद्धूचा आणखी एक मित्र उपस्थित होता.

गुरविंदर सिंग यांनी सांगितले की, त्यांनी सिद्धूला बुलेटप्रूफ कारने प्रवास करण्याचे सुचवले होते, मात्र सिद्धूने आपण थारमधून जाणार असल्याचे सांगितले. प्रत्यक्षदर्शी गुरविंदर सिंगने असेही सांगितले की, सिद्धूच्या विनंतीवरून गोळी झाडण्यापूर्वी थारमध्ये ‘उठेगा जवानी विच जनाजा मिठिए’ हे गाणे वाजत होते.

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की ‘उठेगा जवानी विच जनाजा मिठिए’ हे गाणे सिद्धू मुसेवालाने गायले आहे. द लास्ट राइड (The Last Ride) या नावाने अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी हे गाणं रिलीज झाल होत. पंजाबी गायक सिद्धू मूसवालाचे द लास्ट राइड हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गाणे ऐकल्यानंतर असे वाटते की, त्या गाण्याचे बोल सिद्धूच्या मृत्यूशी मिळते-जुळते आहेत. मीडिया रिपोर्ट्समध्ये लोकांच्या हवाल्याने असा दावा केला जात आहे की, सिद्धू मुसेवालाने गाण्यातून आपल्या मृत्यूचा आभास केला होता. गाण्याच्या बोलांमध्ये सिद्धूने लहान वयात मृत्यू, अंत्यसंस्कार इत्यादी गोष्टींचा उल्लेख केला होता.

पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांच्यावर रविवारी संध्याकाळी मानसा जिल्ह्यात हल्ला झाला होता. त्यावेळी तो आपल्या दोन मित्रांसह महिंद्रा थार कारमधून कुठेतरी जात होता. हल्ल्यानंतर काही सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहेत. यावरून दोन वाहनांतून (कोरोला आणि बुलेरो) आलेल्या ८-१० गुन्हेगारांनी हा हल्ला केल्याचे उघड झाले. बोलेरो कार जागेवरच टाकून मारेकरी पळून गेले. या घटनेने देशभरात खळबळ उडाली आहे.

महत्वाच्या बातम्या-
नवज्योत सिद्धू जज असताना त्यांच्यासमोर कॉमेडी करायचे भगवंत माने, आता त्यांना हरवून होणार मुख्यमंत्री
सिद्धू मुसेवालाची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीने सांगितली संपुर्ण रक्तरंजित कहाणी, वाचून हादराल
सिद्धू मुसेवालाची हत्या कोणी केली? काय होते नेमके कारण? पोलिसांनी शोधलं कॅंनडा कनेक्शन
मोठी बातमी! सिद्धू मुसेवाला हत्येचे कँनडा कनेक्शन झाले उघड, धक्कादायक माहिती आली समोर

 

ताज्या बातम्या क्राईम

Join WhatsApp

Join Now