Share

सिद्धू मुसेवालाचा पुण्यातील मारेकरी फक्त 23 वर्षांचा, आई म्हणते.. मी मुलाला पाठिशी घालणारी नाही

crime
प्रसिद्ध पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मुसेवाला यांची काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणाचा पोलीस सध्या जोरदार तपास करत आहेत. या प्रकरणात पोलिसांना मोठा सुगावा लागला आहे. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणात सहभागी झालेल्या आठ शूटर्सची ओळख पटली आहे.

या आठ पैकी एक शूटरला पोलिसांनी पंजाबमधून अटक केली आहे. आता पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणाचे महाराष्ट्र कनेक्शन देखील समोर आले आहे. महाराष्ट्रातील पुण्यामधील दोन शूटर्सचा पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येमध्ये सहभाग असल्याची माहिती मिळत आहे. संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ अशी या दोन शूटर्सची नावे आहेत.

अशातच आता दोषी संतोषच्या आईची प्रतिक्रिया समोर आली आहे. सीता जाधव असे त्यांचे नाव आहे. माध्यमांशी बोलताना त्या म्हणतात, ‘संतोष जाधवचे वय अवघे 23 वर्षांचे आहे. तो एवढा मोठा शूटर होऊ शकत नाही, असे सीता जाधव यांनी यावेळी बोलताना स्पष्टच सांगितले आहे.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, ‘जर संतोष दोषी असेल तर त्याने पोलिसांच्या स्वाधीन व्हावे,’ अस देखील त्यांनी यावेळी बोलताना म्हंटले आहे. मुलाला पाठिशी घालणार नाही, असही त्यांनी बोलताना ठणकावून सांगितलं आहे. सोबतच ‘चुकीचं काही केले असेल तर त्याची शिक्षा भोगून ये,’ असा सल्ला देखील त्यांनी संतोषला दिला आहे.

दरम्यान, सध्या पोलिसांकडून दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये तपास सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमधून सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येत सहभागी असलेल्या शूटर्सना अटक केली आहे. यामध्ये सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येमध्ये राजस्थानमधील तीन, पंजाबमधील तीन आणि महाराष्ट्रातील दोन शूटर्सचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

यामध्ये महाराष्ट्रातील पुण्यातील दोन शूटर्सचा समावेश आहे. संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ या दोन शूटर्सचा सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येमध्ये सहभाग असल्याचे समोर आले आहे. संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ यांच्यावर यापूर्वी देखील गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. बाणखेले खून प्रकरणात दोघेही मोक्काचे फरार आरोपी आहेत.

महत्त्वाच्या बातम्या 
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now