Share

मुसेवालाची हत्या करणारे शुटर आंबेगाव, जुन्नरचे; मुसेवाला प्रकरणात धक्कादायक माहिती आली समोर

प्रसिद्ध पंजाबी सिंगर सिद्धू मुसेवालाची हत्या करण्यात आली होती. २९ मे रोजी पंजाबमधील मन्सा जिल्ह्यात जवाहरके गावात त्याची हत्या करण्यात आली होती. या हत्येमुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच याबाबत रोज नवीन खुलासे होत आहे. (sidhu moosewala shooter connection in pune)

अशात एक मोठी बातमी समोर आली आहे. या हत्येचे कनेक्शन आंबेगाव आणि जुन्नर तालुक्याशी असल्याचे उघड झाले आहे. या भागांमधील दोन तरुणांची नावे समोर आली आहे, ज्यांनी सिद्धूची हत्या केली होती. आंबेगावातील पोखरी येथे राहणारा संतोष जाधव (वय२४) आणि जुन्नर येथील मढ-पारगाव येथे राहणारा सौरभ महाकाळ या दोन तरुणांची नावे समोर आली आहे.

संतोष आणि सौरभ हे दोन्हीही सध्या फरार आहे. त्यांची नावे देशपातळीवर गेल्याने राज्यभरात त्यांचीच चर्चा सुरु आहे. महाराष्ट्र, पंजाब व राजस्थान या तिन्ही राज्यातील पोलिस त्यांचा शोध घेत आहे. संतोष जाधव हा भीमाशंकर येथील आदिवासी भागात राहत होता. मंचर इथून त्याने गुन्हेगारीला सुरुवात केली होती.

हत्या, मुलींचे अपहरण, खंडणी, हल्ला याप्रकरणी त्याच्यावर मंचर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पण तो फरार झाला होता. पुणे पोलिस त्याला शोधण्यासाठी पंजाबमध्येही गेले होते, पण तो तिथूनही फरार झाला होता. वडिल नसल्यामुळे त्याची आई लोकांची धुणीभांडी करत होती. संतोष हा फक्त १६ वर्षांचा असताना त्याने कळंबच्या माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला केला होता.

त्यानंतर पोलिसांनी संतोषला ताब्यात घेतले होते आणि त्याला बालसुधारगृहात पाठवले होते. त्यानंतर सुटून बाहेर आल्यानंतर तो सराईत गुन्हेगार बनला होता. त्याने २०२१ मध्ये एका व्यक्तीवर गोळीबार करुन त्याची हत्या केली होती. त्यानंतर तो फरार झाला होता.

संतोषला पकडण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांचे पथक हरियाणा, पंजाब आणि राजस्थानमध्येही गेले होते. पण तिथूनही तो फरार झाला होता. त्यानंतर महाकाळसोबत त्याची मैत्री जमली आणि ते संघटीत गुन्हेगारी करु लागले. त्यामुळे पुणे पोलिस आता या दोघांच्या शोधात आहे.

महत्वाच्या बातम्या-
८३ कोटींचा घोटाळा उघडकीस आणल्यामुळे शरीरावर ७ गोळ्या झेलणाऱ्या रिंकू राहीचे UPSC मध्ये सिलेक्शन
. ‘ती’ गोष्ट ऐकली असती तर आज सिद्धू जिवंत असता; ​​सिद्धू मुसेवालाच्या मित्राने केला मोठा खुलासा
सिद्धू मूसेवालाच्या आठवणीत ‘हा’ परदेशी रॅपर स्टेजवरच ढसाढसा रडू लागला; पहा व्हिडिओ

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now