प्रसिद्ध पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मुसेवाला यांची काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणाचा पोलीस सध्या जोरदार तपास करत आहेत. या प्रकरणात पोलिसांना मोठा सुगावा लागला आहे. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणात सहभागी झालेल्या आठ शूटर्सची ओळख पटली आहे.
या आठ पैकी एक शूटरला पोलिसांनी पंजाबमधून अटक केली आहे. आता पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणाचे महाराष्ट्र कनेक्शन देखील समोर आले आहे. महाराष्ट्रातील पुण्यामधील दोन शूटर्सचा पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येमध्ये सहभाग असल्याची माहिती मिळत आहे. संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ अशी या दोन शूटर्सची नावे आहेत.
मुसेवाला हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या संतोष जाधव नुकताच एक खुलासा केला आहे. मुसेवाला प्रकरणात आपला सहभाग नसल्याची कबूली संतोषने पोलिसांना दिल्याची माहिती मिळाली आहे. संतोषने दिलेल्या कबुलीमुळे आता मुसेवाला हत्या प्रकरणाला वेगळे वळण लागणार का? हे पाहणे महत्त्वाच ठरणार आहे.
नुकतीच मुसेवाला हत्या प्रकरणात आरोप असलेल्या संतोष जाधवची पोलिसांनी कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान संतोषकडून अधिक माहिती मिळेल, अशी अपेक्षा पोलिसांना होती. मात्र चौकशीदरम्यान, मुसेवाला हत्येच्या दिवशी आपण गुजरातमध्ये असल्याची माहिती संतोषने पोलिसांना दिली.
यामुळे आता या प्रकरणातील गुंता अधिकच वाढलेला पाहायला मिळत आहे. दरम्यान, सिद्धू मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणात सध्या पोलिसांना मोठा सुगावा लागला आहे. लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी बराड, सचिन थापर, अनमोल बिश्नोई व विक्रम बराड या पाच गँगस्टर्सनी सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा कट रचला होता.
सिद्धू मुसेवालाच्या हत्येबाबत आता पोलिसांच्या हाती नवीन माहिती आली आहे. पंजाब पोलिसांनी चौकशीनंतर सांगितले की, बुलेटप्रूफ वाहनातच मुसेवालाची हत्या करावी, असा लॉरेन्स टोळीचा आग्रह होता. यामुळेच मुसेवालाच्या हत्येसाठी रशियन शस्त्रे एएन ९४चा वापर करण्यात आला.
पुढे याबाबत पोलिसांनी सांगितलं की, मुसेवालाची रेकी करून गँगस्टर्स त्याच्याबाबतची संपूर्ण माहिती शार्प शूटर्सला देत होते. यामुळे आता या हत्या प्रकरणात आणखी कोणते धागेदोरे मिळतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणात सहभागी झालेल्या आठ शूटर्सची ओळख पटली आहे.
महत्वाच्या बातम्या-
पंकजा मुंडेंचे भाजप सोडण्याच्या दिशेने पहिले पाऊल? त्या कृतीने समर्थकांना दिला सुचक संदेश
आमचा मुलगा शत्रूच्या गोळ्यांचा बळी असता तर, अभिमान वाटला असता, पण..; दुर्दैवी बापाची मन हेलावून टाकणारी कहाणी..
भाजपकडून आमदारांना फोन करून दबाव टाकला जातोय, नाना पटोलेंचा गंभीर आरोप