बॉलिवूडमध्ये अफेयरच्या चर्चा नवीन नाहीत. अनेक कलाकार एकमेकांना डेट करत असतात. यामध्ये अशा एक कपलचे नाव जोडले गेले आहे. जे मागील अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. ते म्हणजे अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी. ही जोडी सध्या चर्चेत आहे. ‘शेरशाह’ या दोघांचे नाव जोडले आहे. या चित्रपटापासून हे दोघे एकमेकांना डेट करत आहे.
मात्र, अजूनही या दोघांनीही आपल्या नात्याबद्दल उघडपणे बोले नाही. कियारा आणि सिद्धार्थने ‘शेरशाह’ या चित्रपटामध्ये पहिल्यांदा एकत्र काम केले होते. इतकेच नव्हे तर या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. सध्या या दोघांचा एक क्यूट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सिद्धार्थ आणि कियारा एकमेकांना खूप प्रेमाने मिठी मारताना दिसत आहेत.
हा व्हिडिओ ‘दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२२’ या कार्यक्रमातील आहे. या कार्यक्रमात सिद्धार्थ आणि कियारा पुन्हा एकदा एकत्र दिसले. त्याचबरोबर या पुरस्कार सोहळ्यात सिद्धार्थ मल्होत्राला ‘शेरशाह’ साठी क्रिटिक्स सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. ज्याबद्दल तो खूप आनंदी दिसून आला.
व्हिडिओमध्ये या पुरस्कार सोहळ्यादरम्यान रेड कार्पेट एरियामध्ये सिद्धार्थ पॅपराझींसमोर पोज देत होता. याच दरम्यान कियारा देखील तिथे आली. तेव्हा कियाराने सिद्धार्थला पाहिले. त्याला पाहताच ती लाजली. त्यानंतर सिद्धार्थकडे जाऊन मिठी मारली आणि त्याचे अभिनंदन केले.
सध्या सिद्धार्थ आणि कियाराचा हा व्हिडिओ जोरदार चर्चेत आहे. विशेषत: या दोघांचे चाहते त्यांच्या केमिस्ट्रीमुळे खूप खूश आहेत. या व्हिडिओमध्ये कियाराने पिवळ्या रंगाची साडी घातली आहे. या साडीमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. त्याचबरोबर हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने मोठे कानातले आणि अंबाडा घातला आहे. तसेच सिद्धार्थनेे देखील काळया रंगाचा शर्ट घातला आणि काळया रंगाची पँट घातली आहे. ज्यामध्ये तो देखील खूप हँडसम दिसत आहे.
त्याचबरोबर कियाराने ज्या पद्धतीने जाऊन सिद्धार्थला मिठी मारली. तो सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. प्रत्येकजण त्यांच्या केमिस्ट्री आणि जोडीबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. इतकेच नव्हे तर या दोघांच्या रिलेशनशिपची अधिकृत घोषणेची चाहते वाट पाहत आहे.