Siddharth Jadhav : माझे बाबा प्लाझा चित्रपटागृहाबाहेर खाली पेपर टाकून…; आधीची परिस्थिती सांगताना ढसाढसा रडला सिद्धार्थ

siddharth jadhav talking about his life |   मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधवला ओळखत नाही, असा चित्रपटप्रेमी महाराष्ट्रात भेटणार नाही. त्याच्या अभिनय, विनोदी स्वभावामुळे तो घराघरात पोहचला आहे. आज तो मराठीमधील टॉपचा अभिनेता बनला आहे. तसेच तो बॉलवूडसोबतच दक्षिणात्य चित्रपटातही दिसून येणार आहे.

यशाच्या शिखरावर पोहचलेला सिद्धार्थ जाधव हा खुप सामान्य कुटुंबातला मुलगा आहे. कलाक्षेत्रामध्ये उतरवण्यापूर्वी त्याची आर्थिक परिस्थिती खुप खराब होती. आता त्याच्या परिस्थितीबाबत सिद्धार्थ जाधवने आता होऊ दे धिंगाणा या कार्यक्रमात खुलासा केला आहे.

सिद्धार्थ जाधव या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. या कार्यक्रमामध्ये सिद्धार्थ जाधवला खास सरप्राईज देण्यात आलं होतं. पण ते सरप्राईज पाहून त्याच्या डोळ्यात पाणी आले होते. झाले असे की त्याला सरप्राईज म्हणून त्याचे कुटुंबाला मंचावर बोलावण्यात आले होते. आपल्या कुटुंबाला पाहताच सिद्धार्थ भावूक झाला होता.

यावेळी सिद्धार्थचा भाऊ आणि आई-वडील असे सदस्य उपस्थित झाले होते. ते पाहून सिद्धार्थ खुपच भावूक झाला. त्याने आपल्या आई-वडिलांना आणि भावाला मिठी मारली. त्यानंतर त्याने आपल्या वडिलांबाबात एक गोष्ट सांगितली, त्यावेळी तो खुपच भावूक झालेला दिसला.

दादरचा प्लाझा चित्रपटगृहाबाहेर माझे बाबा खाली पेपर टाकून त्यावर झोपायचे. त्यांना अभिमान आहे त्यांच्या पोराने आता त्याच्याचसमोर असलेल्या टॉवरमध्ये घर घेतले आहे, असे सिद्धार्थने सांगितले. पण यावेळी बोलताना त्याचे अश्रू अनावर झाले होते.

दरम्यान, सिद्धार्थ जाधवने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्या चांगल्या अभिनयामुळे त्याला हिंदी चित्रपटांमध्येही काम करण्याची संधी मिळत आहे. इतकंच नाही, तर आता तो दक्षिणात्या चित्रपटातही दिसून येणार आहे. तो साऊथचा सुपरस्टार विजय सेतूपतीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसून येणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

.Gondia : चार महिन्यांची मुलगी सतत रडायची, डॉक्टरांनी एक्सरे काढला तर भयानक सत्य आले समोर

Uttar Pradesh : माहेरच्यांनी हुंड्यात दिली म्हैस, महिलेने शक्कल लढवून थाटला व्यवसाय, अनेकांना दिला रोजगार

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं! पदाधिकाऱ्यांनी दिला थेट सामूहिक राजीनामा, केले ‘हे’ गंभीर आरोप