अभिनेत्री मिताली मयेकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध जोडपे आहेत. दोघेही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. याद्वारे ते नेहमी एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांशी शेअर करत असतात. चाहत्यांकडूनही त्यांच्या या पोस्ट्सना चांगली पसंती मिळत असते. यादरम्यान सिद्धार्थ आणि मितालीने त्यांच्या लग्नानंतरच्या पहिल्या मकर संक्रातीचे खास फोटो शेअर केले आहेत.
सिद्धार्थ-मितालीने त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर हे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये दिसत आहे की, दोघांनी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. तसेच मितालीने काळ्या साडीवर हलव्याचे दागिने घातले आहेत. काळ्या साडीत मितालीचे सौंदर्य अधिकच खुलुन दिसत आहे. तसेच या फोटोंमध्ये दोघेही फारच सुंदर दिसत आहेत.
सिद्धार्थ-मितालीच्या या फोटोंवरून लक्षात येते की, त्या दोघांनी त्यांच्या लग्नानंतरची पहिली संक्रांत उत्साहाने साजरा केला. सध्या त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहते त्यावर भरभरून कमेंट करत लाईकचाही वर्षाव करत आहेत.
मिताली आणि सिद्धार्थ मागील वर्षी २४ जानेवारी रोजी विवाहबंधनात अडकले होते. पुण्यातील ढेपे वाड्यात त्यांचा पारंपारिक ढंगातला खास विवाहसोहळा मित्रमंडळी आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला होता. त्यांच्या या लग्नसोहळ्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. तर लवकरच या दोघांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होणार आहे.
मितालीने ‘उर्फी’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर झी युवावरच्या ‘फ्रेशर्स’ मालिकेतही तिने काम केले होते. त्यानंतर झी मराठी वाहिनीवरील ‘लाडाची मी लेक गं’ या मालिकेतील कस्तुरी या भूमिकेद्वारे ती घराघरात पोहोचली. या मालिकेमुळे तिला फार लोकप्रियता मिळाली.
नुकताच मितालीचा ‘हॅशटॅग प्रेम’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. यामध्ये तिच्यासोबत सुयश टिळक मुख्य भूमिकेत होता. दूसरीकडे सिद्धार्थनेही ‘गुलाबजाम’, ‘क्लासमेट’ यांसारखे अनेक चित्रपट तसेच ‘अग्निहोत्र’, ‘प्रेम हे’, ‘सांग तू आहेस का’ यांसारख्या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
धक्कादायक ! प्रसिद्ध अभिनेत्रीची निर्घूणपणे हत्या; गोणीत आढळला मृतदेह
सई ताम्हणकर बॉयफ्रेंडसोबत गेली होती मुव्ही पाहायला, ‘त्या’ फोटोने झाला मोठा खुलासा
अवॉर्ड शोमध्ये अपमान सहन न झाल्याने शो सोडून तडक निघाली ‘शक्तिमान’मधील गीता; पहा व्हिडिओ