अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. श्वेता दोन दशकांपेक्षा अधिक काळापासून आपल्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या प्रवासात तिने अनेक चढ-उतार पाहिले. पण आपल्या कौशल्याच्या आधारावर तिने इंडस्ट्रीत आपली एक ओळख निर्माण केली आहे. यादरम्यान नुकतीच एका मुलाखतीत बोलताना श्वेताने तिच्या वयावरून ट्रोल करणाऱ्यांचा तिला काही फरक पडत नसल्याचे म्हटले आहे.
श्वेताने नुकतीच बॉलिवूड बबलला मुलाखत दिली. यावेळी बोलताना श्वेताने तिच्या वयावरून तिला ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. तिने म्हटले की, ‘प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास जेव्हा लोक मला म्हातारी म्हणतात तेव्हा मला खूप आनंद होतो. मी स्वतःला भाग्यवान समजते की मी म्हातारी होत चालली आहे आणि मी अशीच मोठी होऊ इच्छित आहे. कारण मी म्हातारी होत असले तरी मी माझे आयुष्य जगत आहे’.
श्वेताने पुढे म्हटले की, ‘मला माहित आहे की, मी ४१ वर्षांची आहे. आणि मला विश्वास आहे की, मी माझी मुले आणि नातवंडांसोबत ६०,७०,८० आणि १०० वर्ष जगेन. मी इथे सर्वांसोबत राहू इच्छित आहे. मला माझ्या मुलांसोबत वेळ व्यथित करायचा आहे. त्यामुळे मला कोणी म्हातारी म्हटलं तरी मला काही वाईट वाटत नाही’.
श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीनेसुद्धा सिनेसृष्टीत पाऊल ठेवले आहे. पलकने हार्डी संधूच्या ‘बिजली बिजली’ या म्यूझिक व्हिडिओद्वारे डेब्यू केला होता. पण पलकलाही तिच्या लूकवरून अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला. काही ट्रोलर्सनी तर तिला कुपोषित देखील म्हटले.
याबाबत बोलताना श्वेताने सांगितले की, ‘लोक म्हणतात की, पलक किती सुकडी आहे. पण मी पलकला काही बोलत नाही. तुम्ही कसे दिसता यापेक्षा तुम्ही किती स्वस्थ आहात हे महत्त्वाचे आहे. तुम्ही दिसायला सुंदर आहात, स्वस्थ आहात, आरोग्यदायी आहात तर बाकी गोष्टी विचारात घेणे गरजेचे नाही. त्यामुळे पलकसुद्धा आरोग्यदायी आहे. त्यामुळे मला तिच्या दिसण्यावरून काही फरक पडत नाही’.
‘सध्या सोशल मीडिया लोकांना केवळ ट्रोल करण्यासाठीच आहे. लोक पलकला कुपोषित असल्याचेही म्हणतात. पण मला याचा काही फरक पडत नाही. तसेच पलकसुद्धा असे कमेंट्स गांभीर्याने घेत नाही’, असेही श्वेताने यावेळी सांगितले. दरम्यान, पलक लवकरच ‘रोजी : द सैफरन चॅप्टर’ या चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये विवेक ओबेरॉयसुद्धा मुख्य भूमिकेत आहे.
श्वेता तिवारीबद्दल सांगायचे झाल्यास तिची ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतील प्रेरणी ही भूमिका फारच गाजली होती. या मालिकेमुळे श्वेताला खूप लोकप्रियता मिळाली. तसेच श्वेताला बिग बॉस ४ या शोमुळेही ओळखले जाते. या शोची ती विजेती बनली होती.
महत्त्वाच्या बातम्या :
‘मी कोणती जात मानत नाही आणि मला स्वतःलाही कोणत्याही जातीच्या बेडीत अडकवू नका’; नागराज मंजुळेंनी केलं आवाहन
‘द कश्मीर फाईल्स’चित्रपट पाहून सलील कुलकर्णी म्हणाले, ‘टूटे हुए लोग बोलते नहीं है, उन्हें सुनना पडता है’
‘द कश्मीर फाईल्स’चे पंतप्रधान मोदींनी केले कौतुक; दिग्दर्शक आभार मानत म्हणाले…