shubhaman gill revealed urvashi and rishabh relation | बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेलामुळे नेहमीच चर्चेत असते. उर्वशी आणि ऋषभच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर चर्चाही होत असते. दोघांचे आता वादही झाले होते. अशात दोघांमध्ये नक्की काय आहे हे आता समोर आले आहे. भारतीय संघाचा स्टार खेळाडू शुभमन गिलने यावर वक्तव्य केले आहे.
शुभमन गिलच्या मुलाखतीची क्लिप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये अँकर शुभमन गिल उर्वशी आणि ऋषभ पंत यांच्या नात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसत आहे. शुभमन गिलला विचारले जाते की, शुभमन, आजकाल ऋषभ पंतला अभिनेत्रीच्या नावाने खूप चिडवले जाते. संघातही त्याची अशीच छेड काढली जाते का?
यावर शुभमन गिल म्हणतो की, ती स्वत:हून सर्वांचं लक्ष वेधून घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याला संघात कोणीही चिडवत नाही. तसेच त्याचा आणि तिचा काहीही संबंध नाहीये. शुभमन गिलच्या या उत्तरानंतर अँकरने आणखी एक प्रश्न विचारला होता.
ऋषभ पंतला इतके चिडवले जाते. त्यामुळे त्याच्या खेळावर याचा परिणाम होतो का? चिडवण्यामुळे ऋषभला अडचणी येतात का? त्यावर तो म्हणाला की, त्याला अजिबात काळजी नाही, कारण त्याला माहित आहे की काहीही नाहीये. त्याला चिवडल्याने काहीही फरक पडत नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत यांनी कधीकाळी एकमेकांना डेट केले होते. पण आता दोघेही एकमेकांपासून लांब गेले आहे. दोघे एकमेकांना टोमणे मारतानाही दिसून येत असतात. तसेच त्यांचा सोशल मीडियावरचा वादही चर्चेचा विषय ठरला होता.
एका मुलाखतीत उर्वशी रौतेलाने मिस्टर आरपी माझ्यासाठी १० तास थांबला असे म्हटले होते. तर ऋषभ पंतने उर्वशी हे फक्त हेडलाईन्समध्ये जागा मिळवण्यासाठी करत आहे, असे म्हटले होते. त्यानंतर त्यांच्यात चांगलाच वाद झाल्याचे दिसून आले होते.
महत्वाच्या बातम्या-
modi government : केंद्राने राज्यपाल नेमलाय की ठरवून महाराष्ट्राचा अपमान करणारा भाजपचा कार्यकर्ता पाठवलाय?
suryakumar yadav : न्युझीलंडमध्ये आलं सूर्याचं वादळ, नाबाद शतक ठोकत भारताला मिळवून दिला दणदणीत विजय
वेग ताशी १५० हून जास्त; उमरान मलिकलाही फिकी पाडणारी आणखी एक स्पिडगन, अवघ्या २२ व्या वर्षीच…