श्रीलंकेच्या पंतप्रधानांच्या सुनेनं कुटुंबियांसोबत सोडला देश, श्रीलंका आता वाऱ्यावर, लोकं संतापले

सध्या श्रीलंकेला मोठा आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. श्रीलंकेमध्ये सर्व जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे श्रीलंकेमध्ये आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच श्रीलंकन(Shrilankan) मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांनी देखील आपापल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.(shrilankan prime minister rajpakshe daughter in law escape from country)

राजपक्षे कुटूंबाने श्रीलंकेची अर्थव्यवस्था डबघाईला आणली आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे. यादरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राजपक्षे कुटूंबातील काही व्यक्ती देश सोडून पळून गेले असल्याची माहिती मिळत आहे. श्रीलंकेतील एका प्रसिद्ध वृत्तपत्राने यासंदर्भातील बातमी दिली आहे.

महिंद्रा राजपक्षे यांचा मुलगा नमल राजपक्षेची पत्नी लमिनी राजपक्षे हिने श्रीलंकेतून पलायन केले आहे. राजपक्षे कुटूंबातील नऊ जण देखील त्यांच्यासोबत पळून गेले आहेत. राजपक्षे कुटूंबाने कोणत्या ठिकाणी पलायन केले, याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. ३ एप्रिल रोजी पहाटेच या लोकांनी श्रीलंका देश सोडला आहे.

यामुळे श्रीलंकेतील नागरिक आणखीनच संतापले आहेत. राजपक्षे कुटुंबातील सर्वजण मिळून श्रीलंकेवर सत्ता गाजवत होते. राजपक्षे कुटुंबातील चार भावांनी मिळून श्रीलंकेला कंगाल केले आहे, असा गंभीर आरोप तेथील जनतेने केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून श्रीलंकेत राजपक्षे कुटुंबाची सत्ता आहे. राजपक्षे कुटुंबातील चार भाऊ श्रीलंकन मंत्रिमंडळात महत्वाच्या खात्याचे मंत्री होते.

राष्ट्रपती, पंतप्रधान, अर्थमंत्री आणि कृषिमंत्री ही श्रीलंकन सरकारमधील महत्वाची पदे राजपक्षे कुटुंबाकडे होती. या चार महत्वाच्या पदांवर असणाऱ्या व्यक्तींनी बेजबाबदारपणे निर्णय घेतल्यामुळे श्रीलंका देश डबघाईला आला आहे, असा आरोप केला जात आहे. श्रीलंकेत निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे आणि परकीय चलनाच्या तुटवड्यामुळे मध्यवर्ती बँकेच्या प्रमुखाने आपला राजीनामा दिला आहे.

सध्या श्रीलंकेमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा देखील तुटवडा निर्माण झाला आहे. तसेच वैद्यकीय औषधे, वस्तू यांची देखील टंचाई निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम रुग्णांना भोगावा लागत आहे. श्रीलंकन सरकारने जपान, चीन, भारत इत्यादी देशांकडून कर्ज घेतले आहे. काही वर्षांपूर्वी पैसा आणि संपत्तीने सदन असणाऱ्या या राष्ट्राला आता आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

महत्वाच्या बातम्या :-
मोदींच्या गुजरातमध्ये आपचे ‘इतके’ उमेदवार निवडणूक येणार, सर्वेक्षणातून मोठी माहिती समोर
..म्हणून भारतात मोटारसायकल जास्त विकल्या जातात, महिंद्रांनी दिलेले उदाहरण पाहून खळखळून हसाल
‘या’ कारणांमुळे श्रीलंकेसारखीच भारतातील अनेक राज्ये होणार कंगाल, यादी वाचून तुम्हालाही बसेल धक्का