Share

Shrilanka : क्रिकेटविश्वात खळबळ! वर्ल्डकप सुरू असताना ‘या’ स्टार खेळाडूला बलात्काराच्या आरोपाखाली अटक

T20 World up

shrilankan cricketer danushka guntilka arrested | ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकादरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. श्रीलंकेच्या एका स्टार फलंदाजाला ऑस्ट्रेलियाच्या पोलिसांनी अटक केली आहे. श्रीलंकेचा क्रिकेटर दनुष्का गुणतिलकाला बलात्काराच्या आरोपाखाली सिडनी येथून अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याला शनिवारी पोलिसांनी अटक केली.

रविवारी सकाळी श्रीलंकेचा संघ त्याच्याशिवाय आपल्या देशाला रवाना झाला आहे. गुणतिलका तीन आठवड्यांपूर्वी जखमी झाला होता आणि त्याच्या जागी अशीन बंडारा याला संघात स्थान देण्यात आले होते. परंतु व्यवस्थापनाने त्याला घरी पाठवण्याऐवजी ऑस्ट्रेलियामध्येच ठेवले होते.

आता दनुष्काविरोधात २९ वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार ही २९ वर्षीय महिला असून, तिची आणि त्याची भेट डेटिंग ऍपच्या माध्यमातून झाली होती. ऑस्ट्रेलियन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुणतिलकाने बुधवारी संध्याकाळी महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. गुणतिलकाला रविवारी सकाळी सिडनीच्या सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्टमधील हॉटेलमधून अटक करण्यात आली. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

danushka guntilaka

न्यू साउथ वेल्स पोलिसांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ही महिला ऑनलाइन डेटिंग ऍप्लिकेशनद्वारे अनेक दिवसांच्या चॅट्सनंतर गुणतिलकाला भेटली होती. बुधवार २ नोव्हेंबरच्या संध्याकाळी गुणतिलकाने तिच्यावर बलात्कार केला. असा आरोप त्या महिलेने केला आहे.

संमतीशिवाय संबंध ठेवल्याचा आरोप असलेल्या गुणतिलकाला सिडनी शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्याच्यावर आधीही महिलेच्या संमतीशिवाय संबंध ठेवल्याचे चार गुन्हे दाखल आहे. गुणतिलका पहिल्या फेरीत हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे टी २० विश्वचषकातून बाहेर पडला होता. मात्र, तो ऑस्ट्रेलियात संघासोबत राहिला. नोव्हेंबर २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून त्याने श्रीलंकेसाठी आठ कसोटी, ४७ एकदिवसीय आणि ४६ टी २० सामने खेळले आहेत.

दरम्यान, श्रीलंकेच्या संघाने सुपर १२ मध्ये स्थान मिळवले होते. पण त्यापुढे त्यांची कामगिरी चांगली राहिली नाही. संघाने ५ पैकी फक्त २ सामने जिंकले. सुपर-१२ च्या गट- १ मध्ये श्रीलंकेने ४ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे तो आता वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे.

महत्वाच्या बातम्या-
Sania mirza : सानिया मिर्झा-शोएब मलिक वेगळे होणार? सानिया मिर्झाच्या ‘त्या’ पोस्टने उडाली खळबळ
India : नेदरलँड्सने केला आफ्रिकेचा पराभव अन् भारतालाच झाला फायदा, थेट कापलं सेमी फायनलचं तिकीट
Gautami Patil : मी पण कमरेपर्यंत साडी वर करेन आणि…; गौतमी पाटीलच्या लावणीवर मेघा घाडगेंची धक्कादायक प्रतिक्रिया

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now