मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेने हिंदीत ‘पुष्पा’ चित्रपट हिट होण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. श्रेयसने ‘पुष्पा’ चित्रपटात कोणतीही भूमिका साकारली नाही. पण ‘पुष्पा’ चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनमध्ये त्याने अल्लू अर्जूनला आवाज दिला आहे. त्यानुसार पडद्यामागे राहून त्याने चित्रपटाला यश मिळवून दिले आहे. त्यामुळे श्रेयसचे सर्वत्र कौतुक होत आहे. यादरम्यान श्रेयस तळपदेचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये श्रेयस ‘पुष्पा’ चित्रपटातील डायलॉग (shreyash talpade speaks pushpa dilogue )बोलताना दिसून येत आहे.
सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी श्रेयसचा हा व्हिडिओ त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. मुंबई विमानतळावरचा हा व्हिडिओ आहे. यामध्ये श्रेयस ‘पुष्पा’ चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग ‘पुष्पा नाम सुनके फ्लॉवर समझे क्या? फायर है मैं…’ म्हणताना दिसून येत आहे. श्रेयसचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
‘पुष्पा’ चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनमधील स्वतःचा आवाज बघून अभिनेता अल्लू अर्जूननेही श्रेयस तळपदेचे एका मुलाखतीत बोलताना कौतुक केले होते. अल्लू अर्जूनने म्हटले होते की, ‘श्रेयसजी पुष्पा चित्रपटासाठी तुमचा सुंदर आवाज दिल्याबद्दल खूप आभार. लवकरच आपण भेटू अशी अपेक्षा करतो. ऑन कॅमेरा मी तुमचे आभार मानू इच्छित आहे. पुष्पा या पात्रात स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन काम केल्याबद्दल तुमचे खूप आभार’.
अल्लू अर्जूनचा हा मुलाखतीचा व्हिडिओ श्रेयसने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केला होता. तसेच व्हिडिओ शेअर करत त्याने लिहिले की, ‘तुझ्या या शब्दांबद्दल खूप खूप धन्यवाद अल्लू अर्जून’. पुढे श्रेयसने लिहिले की, ‘पुष्पा चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनसाठी माझा आवाज योग्य आहे असा विचार केल्याबद्दल मनीष शाह तुमचे व माझ्या आवाजातील सुधारणेसाठी आणि माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी डबिंड डायरेक्टर अब्दुल तुमचेही मनापासून धन्यवाद’.
याशिवाय श्रेयसने सर्व प्रेक्षकांचेही आभार मानत लिहिले होते की, ‘पुन्हा एकदा तुमच्या प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद. तुमचे हे प्रेम माझ्यासाठी अनमोल आहेत. यासोबतच श्रेयसने खूप अभिमान वाटत असल्याचेही पोस्टद्वारे सांगितले होते. श्रेयसच्या या पोस्टनंतर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला’.
दरम्यान, ‘पुष्पा’ हा चित्रपट १७ डिसेंबर रोजी तेलुगूसह तमिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषेत प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला खूप मोठा यश मिळाला. आता चित्रपटाला प्रदर्शित होऊन एक महिना उलटला तरी अद्याप चित्रपटाची क्रेझ कमी झाली नाही. तसेच चित्रपटातील गाणी, ल्लू अर्जूनचे डायलॉग्स, डान्स यावर सोशल मीडियावर रिल्सचा पाऊस सुरु आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
पुष्पा पाठोपाठ अल्लू अर्जुनचे हिंदीतील आणखी ६ चित्रपट बाॅलीवूडमध्ये धुमाकूळ घालणार, पहा यादी..
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम कलाकाराला लुटण्याचा प्रयत्न; स्वत:च सांगितला थरारक अनुभव
बोनी कपूर यांनी शबाना आझमीसोबत केला डान्स; व्हिडिओ पाहून जान्हवी म्हणाली, पापा….