मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे लवकरच एका नव्या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘कौन प्रवीण तांबे?'(Kaun Pravin Tambe?) असे या चित्रपटाचे नाव असून हा चित्रपट क्रिकेटपटू प्रवीण तांबे यांच्या कारकिर्दीवर आधारित आहे. या चित्रपटात श्रेयसने प्रवीण तांबे यांची भूमिका साकारली आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. श्रेयसनेही त्याच्या सोशल मीडिया हँडलवर हा ट्रेलर शेअर केला आहे.
डिज्नी प्लस हॉटस्टारच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर चित्रपटाचा ट्रेलर शेअर करण्यात आला आहे. यासोबत लिहिण्यात आले की, ‘वयाच्या ४१ व्या वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या राईट-आर्म्ड लेग स्पिनर असणाऱ्या प्रवीण तांबेची ही गोष्ट आहे. ते कधीही कोणतेही आंतरराष्ट्रीय किंवा प्रथम श्रेणीतील क्रिकेट खेळले नाहीत. पण त्यांनी त्यांच्या नशीबाविरूद्ध लढा दिला आणि त्यात विजयी झाले’.
श्रेयसनेही त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर चित्रपटाचा ट्रेलर शेअर करत लिहिले की, ‘फक्त अजून एक ओव्हर’ करत करत ते जगाच्या सर्वात मोठ्या लीगपर्यंत पोहोचले. वाह प्रविण तांबे. काय स्टोरी आहे तुमची! ते म्हणतात, अजूनही उशीर झालेला नाही. फक्त इच्छा असायला हवी. आम्ही घेऊन येत आहोत क्रिकेटच्या सर्वात अनुभवी नवोदित खेळाडूची न ऐकलेली कथा, ‘कौन प्रवीण तांबे?’
श्रेयसने पुढे लिहिले की, ‘मी इकबाल म्हणून माझ्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर १८ वर्षांनी मी प्रवीण तांबेच्या रूपाने मैदानात परतलो आहे. या माणसाच्या प्रवासामुळे, संघर्षामुळे आणि त्याच्या विजयामुळे ही भूमिका माझ्यासाठी विशेष आहे’.
‘इकबाल म्हणून तुम्ही माझ्यावर प्रेम केलात. आणि आता आशा आहे की, प्रविण तांबे म्हणूनही तुम्ही माझ्यावर प्रेम कराल. तसेच प्रवीण तांबे मी तुमच्या कथेनुसार जगू शकेन, अशी मला आशा आहे. सादर करीत आहोत ‘कौन प्रवीण तांबे?’ कधीही न सांगितल्या गेलेल्या प्रेरणादायी क्रिकेट कथेचा ट्रेलर’.
दरम्यान, ‘कौन प्रवीण तांबे?’ हा चित्रपट १ एप्रिल रोजी डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन जयदीप देसाई यांनी केले आहे. श्रेयस तळपदेसोबत यामध्ये आशिष विद्यार्थी, परमब्रट चटर्जी आणि अंजली पाटील मुख्य भूमिकेत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
PHOTO : राधिकाच्या खऱ्या आयुष्यातील पतीसमोर गुरूनाथही पडेल फिका, वाचा त्यांची भन्नाट लव्हस्टोरी
भाजपच्या विजयाने बॉलिवूडच्या तिन्ही खानला होणार ‘हे’ नुकसान, प्रसिद्ध अभिनेत्याची अजब भविष्यवाणी
‘झुंड’ला मिळालेली ‘एवढी’ जबरदस्त रेटिंग पाहून अमिताभ बच्चनही झाले शॉक, म्हणाले, हे खूपच…