मराठमोळा अभिनेता श्रेयश तळपदे सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत यश ही भूमिका साकारत आहे. या भूमिकेद्वारे तो प्रेक्षकांचे मन जिंकून घेत त्यांच्याकडून कौतुक मिळवत आहे. यादरम्यान श्रेयसने गुरुवारी आपला ४६ वा वाढदिवस (shreyash talpade birthday) साजरा केला. वाढदिवसाच्या निमित्ताने श्रेयसने चाहत्यांना एक खास भेट दिली. काय आहे ती भेट जाणून घेऊया.
श्रेयस तळपदेने चाहत्यांना वाढदिवशी दिलेली भेट म्हणजे तो लवकरच एका नवीन चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘आपडी थापडी’ असे या चित्रपटाचे नाव असून चित्रपटाच्या चित्रीकरणासही सुरुवात झाली आहे. याबाबत श्रेयसने सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली आहे.
श्रेयसने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर चित्रपटाचा एक प्रोमो व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये कोणाही व्यक्तीचा चेहरा दिसत नाहिये. पण एका लहान मुलीचा आवाज ऐकू येत आहे. तसेच ती मुलगी तिच्या वडिलांना भिंतीवर हाताच्या सावलीद्वारे वेगवेगळे आकार करण्यास सांगत आहे. बापलेकीचा मजामस्ती करतानाचा आवाज या व्हिडिओत ऐकू येत आहे.
व्हिडिओ शेअर करत श्रेयसने लिहिले की, ‘आजच्या दिवशी आपणा सर्वांसाठी एक खास भेट. माझ्याबरोबरच आपले प्रेम आणि आशिर्वाद आमच्या या नवीन बाळालाही लाभो. हीच बाप्पा चरणी प्रार्थना. #AapdiThaapdi शूटिंग आरंभ!’ श्रेयसच्या या पोस्टवर त्याचे अनेक चाहते कमेंट करत त्याला वाढदिवसासोबत आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
‘आपडी थापडी’ या चित्रपटात श्रेयससोबत अभिनेत्री मुक्ता बर्वे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर बालकलाकार खुशी हजारे यामध्ये श्रेयस आणि मुक्ताच्या मुलीची भूमिका साकारणार आहे. या तिघांशिवाय चित्रपटात नंदू माधव, संदीप पाठक, खुशी हजारे, नवीन प्रभाकर हे कलाकारही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
दरम्यान, श्रेयस सध्या पुष्पा चित्रपटामुळेही फारच चर्चेत आहे. ‘पुष्पा’ चित्रपट हिट होण्यामागे श्रेयसचा खूप मोठा वाटा आहे. ‘पुष्पा’ चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनमध्ये श्रेयसने अल्लू अर्जूनला आवाज दिला आहे. त्याच्या या आवाजाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. चित्रपटात श्रेयसने कोणतीही भूमिका साकारली नसली तरी पडद्यामागे राहून त्याने चित्रपटाला यश मिळवून दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
..त्यामुळे अभिनय सोडून बॉबी देओलला करावे लागले नाईट क्लबमध्ये काम, कठीण काळात पत्नीने दिली साथ
‘तू खरंच खुप चांगला आहेस, माझं तुझ्यावर निस्वार्थी प्रेम आहे’; श्रेयसला संकर्षणने दिल्या खास शुभेच्छा
‘देव माझ्या ब्रा ची साईज घेत आहे’, अभिनेत्रीच्या वक्तव्याने देशात खळबळ, पहा व्हिडीओ






