Share

केंद्रीय यंत्रणांनी भाजप नेत्यांवर कारवाई केल्याचा पुरावा दाखवा आणि १ लाख रुपये मिळवा; औरंगाबादमधल्या बॅनरची राज्यभर चर्चा

परखड भाषेत कायम बोलणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या घरी रविवारी ईडीचे पथक चौकशीसाठी पोहोचले आणि शेवटी त्यांना अटक झाली. ईडीच्या या धडक कारवाईमुळे राज्यभरात फक्त विरोधकांवरच कारवाई होते, चौकशीचा सासेमिरा लावला जातो, अशी टीका चहूबाजूंनी झाली. यासंदर्भात औरंगाबादमधील लागलेले एक पोस्टर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. (Show evidence of central agencies taking action against BJP leaders and get Rs 1 lakh)

‘भाजपमधील नेत्यांवर ईडी, सीबीआय, आयकर विभागाची कारवाई झाल्याचे आणि भाजपमध्ये गेलेल्यांवर झालेल्या कारवाईची पुढील चौकशी चालू राहिल्याचे पुरावे दाखवा आणि १ लाख रुपये मिळवा,’ अशा आशयाचे बॅनर औरंगाबाद शहरात झळकत आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सचिव अक्षय पाटील यांनी औरंगाबाद शहरात हा बॅनर लावला आहे. बॅनर खाली त्यांनी स्वतःचा संपर्क क्रमांक सुद्धा लिहिला आहे. औरंगाबादमध्ये लागलेल्या राष्ट्रवादीच्या या बॅनरची राज्यभरात चर्चा होत आहे.

एकीकडे राज्यात शिवसेनेच्या संजय राऊतांवर ईडीने मोठी कारवाई केली आणि दुसरीकडे विरोधकांनी पुन्हा एकदा केंद्रीय यंत्रणांचा भाजप करत असलेला गैरवापर हा मुद्दा पुन्हा उपस्थित करत भाजपवर निशाणा साधला.

‘देशात कधी नव्हे ते ऐतिहासिक बहुमताने सरकार आलं. अनेक राज्यांमध्ये भाजप आणि मित्र पक्षांचे सरकार आहे. एवढ्यावरच भाजपची भूक भागत नाही. म्हणून तर त्यांनी केंद्रीय सरकारी यंत्रणांना आपल्या घरगडी बनवला आहे. ईडी भाजपची दुसरी शाखाच आहे,’ अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अक्षय पाटील यांनी भाजपवर खरमरीत टीका केली.

पुढे ते म्हणाले की, ‘ज्या कुणी भाजप नेत्यावर अथवा भाजपमध्ये गेलेल्या नेत्यावर केंद्रीय यंत्रणांनी कारवाई केल्याचे दाखवून देईल. त्याला मी १ लाख रुपयाचे बक्षीस देण्याचे ठरवले आहे. तरी संधीचा लाभ घेऊन भाजप कार्यकर्त्यांनी तरी १ लाख रुपये जिंकण्याचा प्रयत्न करावा. त्यांना माझं खुलं आव्हान आहे,’ असं अक्षय पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-
Alia bhatt: मी माझी ब्रा का लपवून ठेवायची? आलिया भटचा रोखठोक सवाल; सेक्सीस्ट कमेंट्सबद्दल म्हणाली..
Sanjay Raut: पत्राचाळ प्रकरणात गैरव्यवहार झाला कसा? ED च्या बिनतोड युक्तीवादाने राऊतांच्या वकीलाची बोलती बंद
स्मृती इराणीच्या मुलीला मिळाली क्लीनचीट; ‘त्या’ रेस्तराँच्या प्रकरणात हायकोर्टाने दिला महत्वाचा निर्णय

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now