आपल्या आजूबाजूला केव्हा, काय, घडलं याचा अजिबात अंदाज लावता येऊ शकतं नाही. तुम्ही अनेकदा जुळी मुलं जन्माला आल्याच्या अनेक घटना पाहिल्या असतील. मात्र आम्ही तुम्हाला आज अशी गोष्ट सांगणार आहोत यावर तुमचाही विश्वास नाही बसणार, परंतु हे खरं आहे. एका महिलेने चक्क 22 मुलांना जन्म दिला आहे. (shoking this woman gave birth to 22 babies in one year)
मिळालेल्या माहितीनुसार, क्रिस्टिना ओजतुर्क असं या महिलेचं नाव असून ती अवघ्या 24 वर्षांची आहे. क्रिस्टिना रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये राहते. गलिप ओजतुर्क हे रशियामध्ये हॉटेल व्यवसायिक आहेत. जॉर्जियामध्ये या दोघांची ओळख झाली.
क्रिस्टीनाचे पती गॅलीप यांची गणना रशियाच्या अब्जाधीशांमध्ये होते. त्यांचे वय 57 वर्षे आहे. 10 मार्च 2020 रोजी दोघांना पहिले अपत्य झाले. मिळालेल्या माहितीनुसार, क्रिस्टीनाने मार्च 2020 पासून सरोगसीवर सुमारे 1 कोटी 43 लाख रुपये खर्च केले आहेत.
क्रिस्टीनाने वर्षभरातच सरोगसीच्या मदतीने 22 मुलांना जन्म दिला. तिच्या इन्स्टाग्राम बायोवर नजर टाकल्यास असे दिसून येते की, तिला सरोगसीद्वारे 105 मुले हवी आहेत. या महिलेने आपल्या मुलांना सांभाळण्यासाठी घरात 16 लेडीज ठेवल्या आहेत. त्यांना एका वर्षाचा खर्च सुमारे 67 लाख रुपये येतो.
विशेष बाब म्हणजे क्रिस्टीना आठवड्यातून सुमारे 4 लाख रुपये फक्त तिच्या मुलांच्या डायपर आणि इतर गरजांवर खर्च करते. चला जाणून घेऊयात की, नुकतीच भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्रा सरोगसीने आई झाली आहे. प्रियांकाने 2018 मध्ये निक जोनसशी लग्न केले होते.
सरोगसी तंत्रज्ञानाच्या मदतीने आई बनणारी प्रियांका चोप्रा ही एकमेव बॉलिवूड सेलिब्रिटी नाही. प्रियांकाच्या आधी शाहरुख खानची पत्नी, प्रीती झिंटा, आमिर खानची पत्नी, शिल्पा शेट्टी, एकता कपूर आणि तुषार कपूरची पत्नीही सरोगसीच्या आई झाल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
नाद केला भावा तू! ना घोडा, ना कार थेट JCB वरून नवरदेव घेऊन आला वरात; वाचा एका लग्नाची नादखुळा गोष्ट
दिदी मला जेवन करायचय थोडे पैसे देशील का? म्हणणाऱ्या मुलीला मदत न केल्याने रश्मिकाला लोकांनी झापले
याला म्हणतात नशीब! रातोरात स्टार झाला हा बदाम विकणारा व्यक्ती, पहा व्हायरल व्हिडिओ
वयाच्या २१ व्या वर्षीच तुमची मुलगी बनेल लखपती, फक्त ४१६ रुपये गुंतवा आणि मिळवा ६५ लाख