Share

धक्कादायक! पतीसह सांगलीतील दोन मुलं डोळ्यादेखत समुद्रात गेली वाहून, कुटुंबावर शोककळा

पावसाळा सुरू झाला आहे, सगळीकडे हिरवळ पसरली आहे. अशा वेळी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी अनेकजण विविध पर्यटन स्थळांना भेटी देतात. असच एक कुटुंब पर्यटनासाठी संयुक्त अरब अमिरात येथील ओमान येथे गेले असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला आहे.

सांगली मधील जत येथील एक कुटुंब संयुक्त अरब अमिरात येथील ओमान समुद्रामध्ये सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेले असताना, त्यांच्यावर काळाने घाला घातला केला. कुटुंबातील तिघेजण समुद्राच्या लाटांचा अंदाज न आल्याने वाहून गेल्याची घटना घडली आहे. ही घटना ओमान येथे घडली आहे.

मुळचे जत येथील असणारे अभियंता शशिकांत उर्फ विजय महामने हे संयुक्त अरब अमिरात येथील एका कंपनीत इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत, त्यामुळे पत्नी व तीन मुलांच्यासह त्या ठिकाणी ते वास्तव्यास आहे. शशिकांत हे जत येथील प्रसिद्ध वकील राजकुमार महामने यांचे भाऊ आहेत.

रविवारी ईदची सुट्टी होती, त्यामुळे शशिकांत आपले कुटुंब व मित्रांसमवेत ओमान या ठिकाणी फिरण्यासाठी गेले होते. तिथे जात असतानाचा व्हिडिओ देखील त्यांनी बनवून, आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला होता. हे कुटुंब ओमान येथील समुद्र किनाऱ्यावर गेले असता त्या ठिकाणी प्रचंड लाटा उसळत होत्या.

समुद्रात लाटांचा आनंद घेत असताना मोबाइलवरती व्हिडीओ काढणं सुरू होतं. व्हिडीओ काढत असताना एक प्रचंड मोठी लाट आली आणि काहीजण लाटांच्या समवेत समुद्रात ओढले गेले. यामध्ये शशिकांत महामने, त्यांचा मुलगा श्रेयस आणि श्रुती हे तिघे जण देखील वाहून गेले.

माहितीनुसार, यामध्ये शशिकांत यांची पत्नी आणि एक मुलगी बचावली आहे. याबाबत शशिकांत महामने यांचे बंधू राजाराम महामने यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते तातडीने दुबईला गेल्याचे त्यांच्या कुटुंबाकडून सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे महामने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

इतर

Join WhatsApp

Join Now