अमेरिका। आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनेक घटना घडतांना पाहतो. तसेच वैद्यकीय क्षेत्रातील घोटाळे, रुग्णांची केलेली फसवणूक अशा अनेक घटना आपण पहातो. तसेच अवैध पद्धतीने महिलांचा गर्भपात केला जातो. एवढेच नाही तर ज्या महिला गरोदर राहू शकत नाही त्यांच्यासाठी देखील अनेक उपाय-योजना राबविल्या जातात. मात्र त्यासाठी कायदेशीर पद्धतीने प्रक्रिया पूर्ण करावी लागते.
नैसर्गिक पद्धतीने गर्भधारणा न झाल्यास कृत्रिम पद्धतीने गर्भधारणा तंत्र आमलात आणता येतो. मात्र अनेकदा महिलेच्या गर्भात बीजांड निर्मिती होत नसल्यास ते तंत्रही अयशस्वी होते. अशा परिस्थितीत बीजांड दानातून गर्भधारणा होऊ शकते, मात्र त्यासाठी त्या महिलेची परवानगी असावी लागते.
दरम्यान, असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका डॉक्टरचा मोठा घोटाळा तब्बल ४५ वर्षांनी उघड झाला आहे. १९७७ साली अमेरिकेतील जॉन बॉयड कोट्स या डॉक्टरकडे एक महिला आली होती. एका आर्टिफिशियल इन्सेमिनेशन प्रोसीजरसाठी एका मेडीकलच्या विद्यार्थ्यांचे वीर्य या महिलेला देण्यात येणार होते. मात्र या डॉक्टराने वेगळीच शक्कल लढवली.
या डॉक्टराने त्या महिलेची परवानगी न घेता, तिला कोणतीही कल्पना न देता, स्वतःचे वीर्य त्या महिलेला देऊन तिला गर्भवती केले. यामुळे ती महिला गर्भवती राहिली आणि तिने एका बाळाला जन्म दिला. या महिलेचे नाव चेरील रुसो असून ती आपला पती पीटर याच्यासोबत या डॉक्टरांच्या रुग्णालयात गेली होती.
काही वर्षानंतर चेरीलने आपल्या मुलीच्या वडिलांचा शोध घेण्यासाठी तिने डीएनए टेस्ट केली. त्यानंतर वेगळीच धक्कादायक माहिती त्या जोडप्याच्या समोर आली दुसर तिसर कोणी नसून डॉ. जॉन हेच तिचे वडील असल्याचे उघड झाले. तब्बल ४५ वर्षानंतर हे गुपित उघड झाले. त्यानंतर त्या जोडप्याने त्या डॉक्टरविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली.
nypost.com यांनी दिलेल्या वृत्तानुसार, न्यायालयाने डॉ. जॉन यांना दोषी ठरवले आहे. तसेच जवळपास ४० कोटी रुपये दंड ठोठावला आहे. दरम्यान सदर रक्कम ही रुसो कुटुंबियांना देण्याचे आदेश दिले आहे. दरम्यान, या घटनेनंतर चेरीलच्या मुलीचा बाप असल्याचे डॉक्टर जॉन यांनी नाकारले होते. मात्र त्यांचा डीएनए टेस्ट करण्यात आला आणि त्यावेळी डॉक्टर जॉन यांचे बिंग फुटले.
महत्वाच्या बातम्या:
आता निळू फुलेंवर येणार बायोपिक, त्यांच्या वाढदिवसानिमित्त ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्याने केली घोषणा
सुपारीचं व्यसन वाईट! जितेंद्र आव्हाडांचं सूचक ट्विट, ‘नाव न घेता’ कोणावर साधला निशाणा?