Rajeev Sen: सेलिब्रिटी कपल राजीव सेन (Rajeev Sen) आणि चारू असोपा यांचे लग्न मोडकळीस आले आहे. 2019 मध्ये त्यांचे लग्न झाले. पण ते कधीही सुखी वैवाहिक जोडपे राहिले नाहीत. त्यांना एक मुलगी देखील आहे जी एक वर्षाची झाली आहे. राजीव आणि चारूने आपल्या मुलीसाठी पुन्हा एकत्र येण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला, परंतु दोघांनाही इच्छा असूनही त्यांचे लग्न वाचवता आले नाही आणि आता त्यांचा घटस्फोट होणार आहे. आजकाल राजीव आणि चारू एकमेकांना एक्सपोज करण्यात व्यस्त आहेत. Rajeev Sen, Charu Asopa, Marriage, Divorce, Cheating
चारू असोपा यांनी एका मुलाखतीत राजीव सेन यांच्याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. राजीवने तिची फसवणूक केल्याचे चारूने सांगितले. तेही तेव्हा जेव्हा अभिनेत्री गरोदर होती. चारूला राजीवच्या बॅगेत काहीतरी सापडलं ज्यावरून तिला राजीवच्या फसवणुकीची माहिती मिळाली. हे कळताच चारूला मोठा धक्का बसला. राजीवच्या फसवणुकीची माहिती तिने कुटुंबीयांना सांगितली.
चारूचे राजीववर खूप प्रेम असल्याने तिने पतीला आणखी एक संधी दिली. असे असूनही, मुलगी जियानाच्या जन्मानंतरही त्यांच्या नात्यात चढ-उतार आले. मीडियाशी बोलताना चारू म्हणाली, मी प्रेग्नेंसीच्या काळात काही महिने बिकानेरमध्ये राहिल्यानंतर मुंबईला परतले. त्यानंतर मी माझ्या प्रेग्नेंसीमध्ये बराच काळ मुंबईत घालवला.
राजीव सकाळी 11 वाजता वांद्रे येथील जिमसाठी घरून निघायचा. त्यानंतर तो रात्री अकरा वाजता घरी परतायचा. कधी 7, 8 किंवा 9 वाजता. याबाबत मी राजीवला प्रश्न विचारला असता तो अनेकदा म्हणायचा, जेव्हा मी मॅपवर ट्रॅफिक पाहतो तेव्हा मी वांद्र्यात कॉफी पितो. मी ट्रैफिक कमी होण्याची वाट पाहतो, मग मी घराकडे निघतो. या मुद्द्यावर मी राजीववर विश्वास ठेवला.
राजीव म्हणायचा की, कधी कधी तो त्याच्या गाडीत झोपायतो अशी अनेक कारणं राजीवकडे होती. एकदा राजीव मला न सांगता दिल्लीला गेला, तेव्हा मी सामान निट ठेवत होते. तेव्हा अचानक मला राजीवच्या बॅगेत काहीतरी सापडले. यानंतर राजीव माझी फसवणूक करत असल्याचे मला समजले. मी हे सर्व कुटुंबाला सांगितले. संपूर्ण कुटुंबाला याबद्दल माहिती आहे.
चारू पुढे म्हणते, जेव्हाही असे काही घडते तेव्हा मला वाटायचे की मी आता इथे राहणार नाही, मी सरळ निघून जाईन. पण मग कुठेतरी माझं राजीववर खूप प्रेम आहे, म्हणून मी त्याची सगळी चूक विसरून पुढे जात असते. राजीवला दुसरी संधी देऊन मी नेहमीच नवीन सुरुवात करण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या लग्नाची 3.5 वर्षे नवीन सुरुवातीच्या प्रतीक्षेत गेली.
शेवटच्या गणेश चतुर्थीच्या दिवशी झालेल्या पॅचअपनंतर लग्न कुठे चुकले यावर बोलताना चारू म्हणाली, मला वाटले की राजीव जसा आहे तसाच राहील. काही गोष्टी कधीच बदलत नाहीत. आता राजीव स्वतःला बदलेल अशी शक्यता नाही. चारूने सांगितले की, जेव्हा त्याला शेवटच्या वेळी पॅचअप केले गेले तेव्हा राजीवने वचन दिले होते की तो पुन्हा चूक करणार नाही. मुलगी जियानासाठी मी राजीवला संधी दिली. दोघांनी वकिलाला मेसेज करून सांगितले की आमचा घटस्फोट होत नाही.
महत्वाच्या बातम्या-
जनतेतून निवडून आलात मग जनतेत जायला कसली भिती, आमदारांचे पोलिस संरक्षण काढून घ्या; ‘या’ आमदाराची मागणी
Samantha Ruth Prabhu : प्रिय सॅम.., सामंथाच्या आजारपणाबाबत कळताच नागाचैतन्यच्या कुटुंबातून आली पहिली प्रितिक्रिया
Neha Kakkar : इंडियन आयडलच्या मंचावर नेहा कक्करचे गाणे ऐकून अनु मलिकने स्वत:लाच मारली कानाखाली, म्हणाले..