Share

घटस्फोटाचं एक असं कारण समोर आलं आहे जे वाचून झालेत सगळेच हैराण; महिलेने पतीसोबत केलं असं काही…

crime

नवरा – बायको हे नातंच असं खास आहे की, या नात्यात वादही होतात आणि मिटवलेही जातात. छोट्या – छोट्या कारणांवरून नवरा – बायकोच्या नात्यात खटके उडत असतात. मात्र कधी कधी ही भांडणे एवढी टोकाला जातात की, अनेक जण घटस्फोट घेण्याचा मोठा निर्णय घेतात.

कोणताही विचार न करता एवढ्या वर्षाचे आपले नाते एका क्षणात तोडून टाकतात. परंतु घटस्फोट घेण्याची अनेक वेगवेगळी कारणे आहेत जी तुम्ही अनेकदा ऐकली आणि वाचली देखील असतील.  मात्र घटस्फोटाचे असे एक अजब कारण समोर आले आहे की, ते कारण वाचून तुम्हालाही जबर धक्का बसेल.

नुकताच एका व्यक्तीने त्याच्या घटस्फोटाच्या कारणाचा खुलासा केला आहे. कोणत्याही वादामुळे या व्यक्तीचा घटस्फोट झालेला नसून एका वेगळ्याच कारणाने घटस्फोट झाल्याचा खुलासा या व्यक्तीने केला आहे. तर जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय..? या आहे घटस्फोटाचे कारण?

सिंकमध्ये काही खरकटी भांडी तशीच ठेवल्याने या व्यक्तीचा घटस्फोट झाला आहे. कारण वाचून बसला ना तुम्हालाही धक्का, पण ही खरी घटना आहे. या छोट्याश्या कारणावरून या महिलेने 12 वर्षांच नात तोडलं आहे. याबाबत बोलताना या व्यक्तीने याबाबत सविस्तर खुलासा केला आहे.

त्याने सांगितले की, त्याच्या ३४ व्या वाढदिवसादिवशी पत्नीने मोठा धक्का दिला. या व्यक्तीने हे सांगितलं की, घटस्फोटाचं हे कारण केवळ चुकीचंच नाही तर हास्यास्पद आहे. एका ब्लॉग पोस्टमध्ये त्याने त्याचं लग्न मोडण्याच्या कारणाचा खळबळजनक खुलासा केला.

या व्यक्तीने सांगितलं की, तो जास्तकरून सिंकजवळ पाण्याचे ग्लास ठेवत होता. कधी कधी प्लेट्सही ठेवत होता. त्यासोबतच तो कपडेही इकडे-तिकडे ठेवत होता आणि याच कारणावरून त्याचा घटस्फोट झाल्याचे त्याने सांगितले. याचबरोबर घटस्फोटानंतर पत्नीने याबाबत पतीला सांगितलं की, ती तिच्या मुलाला आपल्या सोबत घेऊन जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या
पुन्हा एकदा पडळकरांचा गनिमी कावा यशस्वी; शरद पवारांना पुन्हा दिला जोराचा झटका
आघाडीत बिघाडी! मुख्यमंत्र्यांविरोधात काँगेस नेत्याची थेट सुप्रीम कोर्टात धाव; अंतर्गत वाद चव्हाट्यावर
नाद केला भावा तू! परदेशातील नोकरीला लाथ मारून मायदेशी फुलवली शेती, आज लाखोंची उलाढाल
आमिर खानच्या ‘त्या’ मस्करीमुळे तुटले होते ऐश्वर्याचे आणि त्याचे नाते, आजपर्यंत दिसले नाही चित्रपटात एकत्र

इतर ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now