रशिया आणि युक्रेनमध्ये सध्या युद्ध सुरू आहे. आज युद्धाचा पाचवा दिवस आहे. रशियाकडून सतत होणाऱ्या हल्ल्यामुळे युक्रेनमधील परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत युक्रेन मध्ये शिक्षणासाठी गेलेले भारतीय विद्यार्थी मायदेशी फिरत आहेत, तर काही पोलंडला जाण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र युक्रेनवरून पोलंडला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलंड सीमेवर पोलिसांकडून धक्काबुक्की, गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना भारतात आणण्याच्या हालचाली सुरू आहेत. काहींना सुरक्षित रित्या भारतात आणले गेले आहे. काहीजण भारतात येण्याऐवजी पोलंडला जाण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा वेळी युक्रेनवरून पोलंडला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलंड सीमेवर पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
एवढेच नाही तर, युक्रेनियन सैनिक आणि पोलीस पोलंडच्या सीमेवरून हवेत गोळीबार करत आहेत. शिवाय त्यांच्या कार विद्यार्थ्यांच्या जमावामध्ये घुसवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप या विद्यार्थ्यांनी केला आहे. याचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत.
https://twitter.com/tripathi_yash1/status/1497573594918178816?s=20&t=U5mWGEFTE2oXrl1cslZhTg
माहितीनुसार, पोलंड सिमेवरून या विद्यार्थ्यांना परत युक्रेनमध्ये नेण्याचा प्रयत्न युक्रेनच्या सैनिकांकडून होत असून काही विद्यार्थ्यांना मारहाणही करण्यात आल्याचा आरोप होत आहे. एंजल नामक विद्यार्थीनीने दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनचे पोलीस आपली वाहने विद्यार्थ्यांच्या समुहामध्ये घुसवत असल्यामुळे अनेक विद्यार्थी जमीनीवर पडले आहेत. परंतु, पोलिसांना याची पर्वा नाही.
युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांनी माहिती दिली की, युक्रेन मध्ये अडकलेल्या आमच्या सारख्या अनेक विद्यार्थ्यांना युक्रेन सरकारनं बंकरमध्ये आश्रय घेण्यास सांगितले आहे. परंतु, बंकरमधील लोकांना जेवणही मिळत नाही. प्रचंड हाल होत आहेत.
दरम्यान, युक्रेनच्या राष्ट्रपतींनी भारताला मदतीचा हात मागितला होता. मात्र भारताने कोणालाही मदत न करता शांततेची भूमिका घेतली. अशावेळी युक्रेन कडून भारतीय विद्यार्थ्यांना होणार त्रास पाहून भारत सरकार कोणतं पाऊल उचलेल हे पाहणं आवश्यक राहील.