Share

BJP : सध्याच्या घडीला लोकसभा निवडणूका झाल्यास भाजपचा पराभव नक्की; धक्कादायक आकडेवारी आली समोर

Uddhav Thackeray Sharad Pawar Devendra Fadanvis

BJP : महाराष्ट्रात झालेल्या राजकीय भूकंपामुळे राज्यात प्रचंड उलथापालथी झाल्या. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी केली आणि राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपशी हातमिळवणी करत आपले सरकार स्थापन केले.

तसेच बिहारमधील राजकारणातही अनेक बदल पाहायला मिळालेत. या सगळ्या प्रकारानंतर इंडिया टुडे आणि सी व्होटर्स यांनी त्याबाबत एक सर्व्हे केला आहे. आजघडीला लोकसभा निवडणूक झाली तर महाराष्ट्रात काय चित्र असेल याचे उत्तर या सर्व्हेमध्ये लोकांनी दिले आहे.

शिंदे गटाने आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावाही केला आहे. तसेच शिंदे – फडणवीस हे नवे सरकार स्थापन होऊन जवळपास एक महिना झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. आज लोकसभा निवडणुका घेतल्या गेल्या तर या सगळ्या परिस्थितीचा परिणाम त्यावर होईल, असे लोकांना वाटत आहे.

आज लोकसभा निवडणुका झाल्यास महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी ३० जागा युपीएला म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मिळतील, असे इंडिया टुडे आणि सी व्होटर्सच्या सर्व्हेमध्ये लोकांचे म्हणणे आहे. यासोबतच एनडीएला म्हणजेच भाजपला आणि त्यांच्या मित्र पक्षांना १८ जागा मिळतील असे लोकांना वाटत आहे. त्यामुळे असे घडल्यास हे भाजपसाठी धक्कादायक असेल.

२०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रचंड प्रभाव दिसून आला होता. २०१९ मध्येही तो प्रभाव कायम राहिला. या दोन्ही वर्षांमध्ये एनडीएचे जास्त खासदार निवडून आले. मात्र, महाराष्ट्रात झालेल्या सत्तानाट्यानंतर जर आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर भाजपसाठी हे चित्र धक्कादायक ठरेल, असे लोकांचे म्हणणे आहे.

शिंदे गटाला आणि भाजपला या सर्व्हेचा फटका बसणार आहे. हा अत्यंत धक्कादायक सर्व्हे असल्याचे समोर येत आहे. हा सर्व्हे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र आलेल्या काळात घेतलेला आहे. भाजप आणि शिवसेना यांच्याकडे ४२ जागा होत्या. आता ४८ पैकी ३७ जागांचे बळ भाजपकडे आहे. परंतु, हा आकडा आता १८ वर येऊ शकतो. त्यामुळे आज लोकसभा निवडणूक झाली तर भाजपला याचा मोठा फटका बसू शकतो.

महत्वाच्या बातम्या
Pankaja Munde : मंंत्रिमंंडळात स्थान न मिळाल्यामुळे पंकजा मुंडे यांनी उघडपणे नाराजी केली व्यक्त; म्हणाल्या, मी पात्र…
राजू श्रीवास्तवांच्या प्रकृतीबाबत धक्कादायक माहिती आली समोर; भाऊ म्हणाला, डॉक्टर…
रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीसांचे केले तोंडूभरुन कौतूक, म्हणाले, फडणवीस साहेबांची….
औरंगाबादचे राजकारण तापणार, संजय शिरसाटांना आव्हान देण्यासाठी ठाकरेंनी उतरवला ‘हा’ हुकुमी एक्का

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now