Share

राजू श्रीवास्तवांच्या प्रकृतीबाबत धक्कादायक माहिती आली समोर; भाऊ म्हणाला, डॉक्टर…

कॉमेडीचा बादशहा म्हणून ज्यांनी सर्व प्रेक्षकांना खळखळून हसवले. त्या विनोदवीर राजू श्रीवास्तव यांना काल अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्यावर दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या संदर्भात त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या प्रतिक्रिया सध्या समोर येत आहेत. (Shocking information about Raju Srivastava’s health has come to light)

राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबावर अचानक बेतलेल्या या वेदनादायी प्रसंगामुळे कुटुंबीय मोठ्या चिंतेत आहेत. त्यांचे भाऊ अशोक श्रीवास्तव यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, ‘राजू श्रीवास्तव यांची प्रकृती गंभीर आहे.’

‘डॉक्टरांनी आपले काम केले आहे. त्यांची अँजिओग्राफी करण्यात आली. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणार नाही. डॉक्टरांकडून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत,’ अशी प्रतिक्रिया राजू श्रीवास्तव यांच्या भावाने दिली.

पुढे ते म्हणाले की, ‘या प्रसंगात आम्हाला पंतप्रधान कार्यालयाने मोठा धीर दिला. पीएमओमधील लोक आमच्या संपर्कात आहेत. स्वतः राजनाथ सिंह यांचा फोन येऊन गेला. योगी यांनी तर लखनऊमधून राजू श्रीवास्तव यांच्या उपचारासाठी स्पेशल टीम पाठवली, असेही त्यांच्या भावाने सांगितले आहे.

यासंदर्भात राजू श्रीवास्तव यांची मुलगी अंतरानेही प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली की, ‘माझे वडील कार्यक्रमांच्या निमित्ताने भारतातील विविध शहरांमध्ये फिरायचे. जिममध्ये वर्कआउट करणे हे त्यांचे डेली रुटीन आहे. त्यांची ही अवस्था पाहून आम्ही सगळे शॉक आहोत.

राजू श्रीवास्तव हे सध्या दिल्ली येथील एम्स रुग्णालयात उपचार घेत आहेत. ते आयसीयूमध्ये असून त्यांच्या प्रकृतीत कोणती सुधारणा झालेली नाही. त्यांची प्रकृती लवकरात लवकर ठीक व्हावी, यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी चाहत्यांना प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे.

महत्वाच्या बातम्या-
रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीसांचे केले तोंडूभरुन कौतूक, म्हणाले, फडणवीस साहेबांची….
अभिनेत्रीचं होतंय कौतुक! भाऊ नाही म्हणून मुंबईच्या रिक्षावाल्यांना बांधली राखी, पहा व्हिडीओ
Mukesh Khanna : ‘तुम्ही मुर्ख आहात’, नसीरुद्दीन शाह यांच्या पत्नीवर भडकला ‘शक्तीमान’, वाचा नेमकं काय घडलं?

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now