झी 24 तासच्या रिपोर्टींगनंतर पुण्यातील एक खूप मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. बोगस गुंठेवारी दस्तनोंदणीच्या रॅकेटविषयी सर्वांत पहिल्यांदा झी 24 तासाने वाचा फोडली होती. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तपास केल्यानंतर अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सहमतीने तब्बल 10 हजार बोगस दस्त नोंदणी झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, सरकारने अवैध पध्दतीने गुंठेवारीची दस्त नोंदणी करून घेण्यावर बंदी घातली आहे. मात्र तरी देखील एकट्या पुणे शहरात आणि जिल्हात तब्बल 44 दुय्यम निबंधक आणि कर्मचाऱ्यांनी संगनमताने 10 हजार 561 बोगस गुंठेवारीच्या दस्त्यांची नोंदणी केली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोलिसांच्या कारवाईनंतर 400 पेक्षा जास्त गुंठेवारीचे दस्त नोंदणी करणाऱ्या दुय्यम निबंधकांना त्वरीत निलंबीत करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहे. तसेच पोलीस या नोंदणीत आणखीन कोणाचा हात आहे याचा तपास करीत आहेच.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या नोंदणीअंतर्गत कोट्यवधी रूपयांचा गैरव्यवहार अधिकाऱ्यांनी मिळून केला आहे. त्यामुळे महानिरिक्षक श्रावण हर्डीकर यांनी राज्यातल्या दुय्यम निबंधक कार्यालयातील 44 अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. तसेच अनेकांना तपासासाठी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान पुण्यात एनए ऑर्डर आणि खोटीपत्रे तयार करून अनेक फ्लॅट्सचे रजिस्ट्रेशन चुकीच्या पध्दतीने केले असल्याच्या घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत. खरे तर, फ्लॅटचे रजिस्ट्रेशन करताना मूळ दस्त तपासून रजिस्ट्रेशन करण्यात येते. मात्र पुण्यात याच्या उलट कारभार होताना दिसत आहे.
चुकीच्या पध्दतीने दस्तनोंदणी करण्याच्या घटना पुण्यात वाढताना दिसत आहेत. अशा अवैध्य दस्तनोंदणीमध्ये अनेक बड्या लोकांचा गुंडांचाही हात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या मदतीने याचा फायदा अधिकारीही घेतात. त्यामुळे आता अशा घटनांवर आळा बसण्यासाठी 44 अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
अमित शहा लवकरच समान नागरी कायदा मंजुरीसाठी आणतील, भाजप नेत्याचे मोठे वक्तव्य
फिरायला गेल्यावर बिकीनी घालणाऱ्या अभिनेत्रीने रमजान सुरु होताच घातला बुरखा; फोटो झाले तुफान व्हायरल
इंधनाचे दर वाढवणे ही अर्थ मंत्रालयाची बौद्धिक दिवाळखोरी, सुब्रमण्यम स्वामींचा सरकारला घरचा आहेर
वक्फ बोर्डाच्या जमिनींवर चालवणार बुलडोझर, मदरशांबाबतही केले मोठे वक्तव्य, योगींच्या मंत्र्याची मोठी घोषणा