Share

धक्कादायक! मुलीनेच केला मुलीवर बलात्कार; मोबाईलवर व्हिडीओही बनवला आणि नंतर…

आजपर्यंत तरुणाने तरुणीवर बलात्कार केला आणि व्हिडीओ काढून ब्लॅकमेल केले अशा बातम्या आपण ऐकत आलो. मात्र, आता तरुणीनेच तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. शिवाय तरुणीने पीडित तरुणीचा बलात्कार करतानाचा व्हिडीओ देखील काढला आहे.

ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे घडली आहे. येथे एका तरुणीने दुसऱ्या एका तरुणीचा बलात्कार केला आहे. आरोपी तरुणीने पीडित तरुणीचा बलात्कार करताना व्हिडीओ काढला आहे. पोलिसांनी आरोपी तरुणीला अटक केली आहे.

घडलेली घटना सविस्तर म्हणजे, पीडित आणि आरोपी तरुणीची फेसबुकद्वारे एकमेकींशी ओळख झाली होती. पीडित तरुणी ही गोरखपूर जिल्ह्यात राहणारी आहे. आरोपी तरुणी ग्वाल्हेरमध्येच राहते. त्यांची फेसबुकवर चॅटिंग सुरू झाली. यानंतर आरोपी तरुणीने या मुलीचा फोन नंबर घेतला.

यानंतर यांच्या फोनवर संभाषण सुरु झाले. आरोपी तरुणीने पीडित तरुणीला चित्रपटात काम करून देण्याच्या बहाण्याने आपल्यासोबत ग्वाल्हेरला नेले. यानंतर दहा दिवस तिला एका ठिकाणी कैद करुन ठेवले. तिथे आरोपी तरुणीने पीडित तरुणीचा वारंवार बलात्कार केला.

तिच्या सोबत गैर कृत्य केले, आणि तिचे व्हिडीओ देखील बनवले. यानंतर पीडितेला समजले की आरोपी तरुणी खूप मोठे रॅकेट चावलत आहे. आरोपी तरुणी अनेक तरुणींना आपल्या जाळ्यात ओढत त्यांच्यावर अशाच प्रकारचे अत्याचार करत असल्याचे लक्षात आले.

मोठ्या मुश्किलने पीडित तरुणीने आपल्या कुटूंबियांशी संपर्क साधला. यानंतर पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत पीडितेची सुटका केली. या घटनेने परिसरात खळबळ निर्माण झाली. एका तरुणीने तरुणीसोबतच असे कृत्य केले यामुळे सर्वांनाच धक्का बसला.

क्राईम

Join WhatsApp

Join Now