राजकीय वर्तुळातून अनेक धक्कादायक घटना समोर येत असतानाच आता त्यात आणखी भर पडली आहे. मुंबईत शिवसेना नेत्यांनीच एका कुटुंबाला वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणावर अद्याप शिवसेनेतील बड्या नेत्यांची प्रतिक्रिया आलेली नाहीये. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सरकारमधील नेत्यांकडून होणाऱ्या दादागिरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे सत्ताधारी पक्षातील नेत्यांना सत्तेचा माज आलाय का? असा सवाल सध्या राजकीय वर्तुळात उपस्थित झाला होता.
अशातच आता शिवसेना नेत्यांकडून हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. शिवसेना उपविभाग प्रमुख आणि शाखा प्रमुखाने मोकल कुटुंबाला वाळीत टाकलं असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बोरिवली पश्चिममधील श्री. गावदेवी ग्रामस्थ मंडळ, शिंपोली यांनी हा धक्कादायक ठराव केला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामस्थांच्या बैठकीत न आल्याने या कुटुंबाला वाळीत टाकण्यात आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे विकी मोकल आणि त्यांच्या कुटुंबियांना सार्वजनिक कार्यक्रमात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. यामुळे आता यावर प्रकरणार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तर आता या प्रकरणी पीडित कुटुंबाने आता शासन दरबारी न्यायाची मागणी केली आहे. विकी मोकल यांनी थेट सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंढे यांच्याकडे या प्रकरणावर दाद मागत तक्रार केली आहे. याचबरोबर मोकल यांनी थेट पोलिस स्टेशनमध्ये देखील तक्रार दाखल केल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, शिवसेनेचे बोरिवली उप विभागप्रमुख दामोदर म्हात्रे आणि शाखा प्रमुख सुनील पाटील यांच्या सांगण्यावरुनच वाळीत टाकण्यात आल्याचा गंभीर आरोप मोकल कुटुंबीयांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी मोकल यांच्या सुनेने याबद्दल तक्रार केली होती, संबंधित व्यक्तींवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. मात्र यापूर्वी दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी ग्रामस्थ मंडळाचा कुटुंबावर दबाव होता, असे पत्रात म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
२ तासांचा पेपर ३ मिनिटांत संपवणाऱ्या ४ UPSIच्या उमेदवारांची तुरुंगात रवानगी; वाचा संपूर्ण प्रकरण…
तारक मेहता यांनी खरंच शो सोडला का? अखेर निर्मात्यांनी सोडले मौन, चाहतेही झाले हैराण
केतकी चितळे आता पक्की अडकली; आणखी एका गुन्ह्यात कोर्टाने केली पोलीस कोठडीत रवानगी
राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित! दौऱ्याला कडाडून विरोध करणारे ब्रिजभूषण सिंह स्पष्टच बोलले, म्हणाले…