Share

धक्कादायक! दीड महिने घरात डांबून ठेऊन विवाहितेवर केले अत्याचार, मुलानी दरवाजा उघडला आणि..

नोकरी लावण्याच्या बहाण्याने विवाहित महिलेला आणि तिच्या मुलाला दीड महिन्यापासून घरात कोंडून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या महिलेवर आणि तिच्या मुलावर तब्बल दीड महिने अत्याचार सुरू होता. त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल ऐकून पोलिसांना देखील धक्का बसला आहे.

पीडित महिलेची एका कंपनीत कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या कामगाराशी ओळख झाली होती. महिलेला कामाची गरज होती. त्या कामगाराने महिलेला आणि तिच्या 14 वर्षांच्या मुलाला 26 नोव्हेंबर रोजी पेपर कप बनवणाऱ्या कंपनीत कामाला लावले. कामाला लावण्याआधी त्याने दोघांकडून संबंधित कागदपत्रे जमा केली.

काम लागल्याने दोघे मायलेकरं खुश होती. कामाच्या पहिल्या दिवशी कामावरून महिला आणि तिचा मुलगा येत असताना आरोपीने दोघांना त्याच्या कारमध्ये बोलावले. ओळख असल्यामुळे दोघेही कारमध्ये बसले. आपल्या आयुष्यात पुढे वादळ येणार आहे याची मायलेकरांना कानोकान खबर नव्हती.

आरोपीने त्या दोघांना आपल्यासोबत नेले. क्रांती चौकाजवळील घरामध्ये डांबून ठेवले. त्यानंतर तब्बल दीड महिने आरोपीने त्या दोघांवर अत्याचार केला. बाहेरील लोक बोलावून महिलेवर आळीपाळीने बलात्कार केला. या घटनेची आसपासच्या परिसरातील लोकांना काहीच चाहूल लागू दिली नाही.

दरम्यान, 15 जानेवारी रोजी महिलेने आणि तिच्या मुलाने कसाबसा दरवाजा उघडून त्या ठिकाणाहून पळ काढला. पीडित महिला 32 वर्षांची असून, पीडित महिलेने याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर, पोलिसांनी आरोपी संभाजी आसाराम शिंदे याला अटक केली.

संबंधित आरोपी 24 वर्षांचा असून, तो जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील आहे. त्याला 3 जानेवारीला प्रथम वर्गदंडाधिकारी एस. एस. मांजरेकर यांच्या कोर्टात हजर करण्यात आले होते. तेव्हा सरकारी वकील भागवत काकडे यांनी घराचा पंचनामा करण्यासाठी,आणि संबंधित आरोपीच्या साथीदारांना अटक करण्यासाठी आरोपीला पोलीस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली. त्यावर,आरोपीला पाच फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

क्राईम

Join WhatsApp

Join Now