अमेरिकेत एक अतिशय विचित्र घटना समोर आली आहे. अमेरिकेत एका व्यक्तीने त्याच्या प्रायव्हेट पार्टवर कोकेनचं इंजेक्शन घेतलंय. त्यानंतर त्याचा प्रायव्हेट पार्ट आणि पाय सुजल्याची तक्रार त्याने केली. त्याच्या प्रायव्हेट पार्टचे टिश्यू खराब झाल्याचंही समोर आलं आहे.(Shocking! A private injection of cocaine was taken on a private part)
या सर्व प्रकारानंतर तो व्यक्ती थेट डॉक्टरांकडे गेला. मोठ्या प्रयत्नानंतर डॉक्टरांनी त्याचा जीव वाचवला आहे. इंजेक्शन घेतल्यानंतर तरुण जेव्हा डॉक्टरांकडे गेला. तेव्हा डॉक्टरांनी त्याच्या प्रायव्हेट पार्टची तपासणी केली. त्यानंतर डॉक्टरांना त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये सूज असल्याचं दिसून आलं. शिवाय त्याच्या मूत्रमार्गाजवळ फोडंही आले होते.
उपचारादरम्यान, डॉक्टरांना वाटलं की ही व्यक्ती गँगरीनने ग्रस्त आहे. मात्र तपासणीदरम्यान डॉक्टरांना असं काही आढळून आलं नाही. यानंतर डॉक्टरांनी त्या व्यक्तीला सांगितलं की, त्याचा प्रायव्हेट पार्ट कापावा लागेल. हे ऐकून त्या व्यक्तीने प्रायव्हेट पार्ट कापण्यास नकार दिला. डॉक्टरांनी औषधाद्वारेच त्या व्यक्तीवर उपचार सुरू केले आणि तो संसर्ग थांबला.
उपचारादरम्यान हा रुग्ण अनेक वर्षांपासून सुयांच्या सहाय्याने नशा करत असल्याचं आढळून आलं. या तरुणाने शरीराच्या जवळपास सर्व भागांवर सुया टोचल्या होत्या. त्याच्या शरीरावर इंजेक्शनच्या खुणा दिसत होत्या. प्रत्येक वेळी नशेचे इंजेक्शन नवीन ठिकाणी द्यावं लागतं.
अशा स्थितीत त्या व्यक्तीला शरीरात अशी कोणतीही जागा न मिळाल्याने त्याने कोकेनने भरलेले इंजेक्शन प्रायव्हेट पार्टवर टोचलं. यापूर्वीही कोकेनने भरलेले इंजेक्शन त्याच्या प्रायव्हेट पार्टवर टोचले होते. जेव्हा त्याने तिसऱ्यांदा त्याच्या प्रायव्हेट पार्टला इंजेक्शन टोचलं तेव्हा त्याला खूप वेदना जाणवल्या.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, व्यक्तीने ज्या रक्तवाहिनीवर इंजेक्शन दिलं होतं. त्यामुळे त्याचा जीव वाचणे खूप कठीण होते. परंतु या प्रकरणात केवळ औषधांमुळेच व्यक्तीचे प्राण वाचले आहेत. असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
महत्वाच्या बातम्या
कोरोनामुळे भाऊ गेला, विधवा वहीनीसोबत दिराने लग्न करत समाजापुढे ठेवला आदर्श
सारा अली खान झाली oops moment ची शिकार, कारमधून उतरताना घसरली पॅन्ट; पहा व्हिडिओ