Share

Sania Mirza : सानिया मिर्झा-शोएब मलिकच्या नात्यात आलाय दुरावा? सानिया म्हणाली, मी सर्वात वाईट…

sania mirza shoaib malik

shoaib malik and sania mirza relation  | भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये क्रिकेट खूप लोकप्रिय आहे. जेव्हा-जेव्हा दोन देशांत क्रिकेटचा सामना होतो. तेव्हा तेव्हा तो सामना पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. अनेक पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी भारतीय महिलांशी लग्न केले आहे. त्यात पाकिस्तानचा स्टार खेळाडू शोएब मलिक याचेही नाव आहे.

शोएब मलिकने भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाशी लग्न केले आहे. दोघांच्या लग्नाला अनेक वर्षे झाली असून त्यांना मुलगाही आहे. पण आता त्यांच्यात काही ठीक नसल्याची चर्चा आहे. ते दोघेही लवकरच वेगळे होणार असल्याच्या बातम्याही येत आहे.

भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये तिने लिहिले आहे की, मी माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट परिस्थितीतून जात आहे. तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये सानिया मिर्झा आणि तिचा मुलगा इझान दिसत आहे.

इझान तिच्या नाकावर चुंबन घेत आहे. सानियाने यापूर्वी एका इंस्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटले होते. तुटलेल्या हृदयाचं पुढे काय होतं? तिच्या अशा पोस्टमुळे तिच्यात आणि शोएब मलिकमध्ये काही ठीक नसल्याची चर्चा आहे. मात्र अद्याप सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांनी याबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांनी नुकताच त्यांचा मुलगा इझानचा वाढदिवस साजरा केला होता. याचे अनेक फोटो शोएबने सोशल मीडियावर पोस्ट केले होते, पण सानियाने तसे केले नाही. यावरुन अनेकजण वेगवेगळे तर्कवितर्क लावताना दिसून येत आहे.

तसेच पाकिस्तानी क्रिकेट शो ‘आस्क द पॅव्हेलियन’ मध्ये शोएब मलिकला एक प्रशन विचारण्यात आला होता. त्याला सानिया मिर्झाच्या टेनिस अकादमीबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्याने सांगितले की, मला याची माहिती नाही. ज्यावर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.

दरम्यान, सानिया मिर्झाने २०१० मध्ये हैदराबादमध्ये पाकिस्तानच्या शोएब मलिकशी लग्न केले. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये जोरदार खळबळ उडाली होती. शोएब मलिकची गणना पाकिस्तानच्या सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये केली जाते. त्याने पाकिस्तानसाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. त्याचबरोबर सानिया मिर्झाने टेनिस विश्वात भारताचे नाव उंचावले आहे.

महत्वाच्या बातम्या-
Virat Kohli : वयाच्या ३४ व्या वर्षी विराटने घेतला सुपरमॅन कॅच, व्हिडिओ पाहून चाहतेही झाले शॉक
India : अखेर ठरलं! भारत सेमी फायनलमध्ये भिडणार ‘या’ संघासोबत, जाणून कधी आणि कुठे आहे सामना
India : झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात भारताचा ७१ धावांनी दणदणीत विजय, ‘हे’ खेळाडू ठरले सामन्याचे हिरो

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now