Share

Eknath Shinde : कोकणात शिंदे गटाला मोठा धक्का! शिंदे गटात गेलेले ‘हे’ नेते अन् कार्यकर्ते पुन्हा ठाकरे गटात सामील

Uddhav Thackeray Eknath Shinde

shivsena workers leave eknath shinde group  | एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत महाविकास आघाडीचे सरकार पाडले होते. बाहेर पडताना ते शिवसेनेचे ४० आमदारसोबत घेऊन बाहेर पडले होते. त्यानंतर त्यांनी भाजपसोबत हात मिळवणी करत सरकार स्थापन केले आहे. पण शिंदे गटात काही आमदार नाराज असल्याचीही चर्चा आहे.

अशात एकनाथ शिंदे पहिला मोठा धक्का बसला आहे. कणकवलीतील शिंदे गटाच्या दोन कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाचे शिवसेना नेते सतीश सावंत आणि जिल्हा युवा सेनाप्रमुख सुशांत नाईक यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

माजी खासदार सुधीर सावंत व किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वीच युवासेनेचे कार्यकर्ते प्रज्योत मोहिरे आणि सुजय पाटणकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. पण त्यांचा पक्षप्रवेश काही क्षणाचाच ठरला होता.

त्यानंतर प्रज्योत मोहिरे आणि सुजय पाटणकर यांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या गटात प्रवेश केला. शिंदे गटात गेलेले एकेक कार्यकर्ते पुन्हा एकदा ठाकरे गटाकडे वळताना दिसून येत आहे. त्यांचे शिवसेनेचे नेतेही स्वागत करताना दिसून येत आहे.

या प्रवेशावेळी खारेपाटण-तळेरे विभाग प्रमुख दयानंद कुडतरकर, उपविभाग प्रमुख शिवाजी राऊत, युवासेना प्रमुख तेजस राऊत, जेष्ठ शिवसेना कार्यकर्ते अनंतराव गांधी आणि इतर काही प्रमुख नेते यावेळी पक्षप्रवेशावेळी उपस्थित होते.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या गटात काही आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. सातारा जिल्ह्यातील महेश शिंदे हे आमदार आहेत. त्यांना पालकमंत्री शंभूराज देसाई हव्या त्या पद्धतीने काम करु देत नाही. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता शिंदे गटात फुट पडणार की काय अशी चर्चा रंगली आहे.

महत्वाच्या बातम्या-
सचिनचा ‘हा’ बालपणीचा जिवलग मित्र होणार भारतीय क्रिकेटच्या निवड समितीचा अध्यक्ष? महाराष्ट्राला मोठा मान
विनोद कांबळी होणार टिम इंडीयाच्या निवड समितीचा अध्यक्ष?
Suryakumar yadav : जबरदस्त फॉर्ममध्ये असूनही सूर्या टीम इंडियातून बाहेर, ‘या’ कारणांमुळे BCCI ने घेतला मोठा निर्णय

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now