Share

नितेश राणेंनी सोबत असलेल्या पोलिसांना बाजूला ठेवून घरी जाऊन दाखवावं; शिवसेनेने दिले आव्हान

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना पोलिसांनी अटक केली आहे. जेव्हा मुंबई पोलिसांनी त्यांना अटक केली, तेव्हा शनिवारी रात्री भाजप नेते किरीट सोमय्या त्यांना भेटायला गेले होते. मात्र त्यावेळी शिवसैनिकांनी त्यांच्यावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात सोमय्या जखमी झाले. (shivsena workers angry on nitesh rane)

किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर भाजप नेतेही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. अशात भाजप नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. त्यावरुन आता शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेना आमदार वैभव नाईकांनी नितेश राणेंना इशारा दिला आहे.

नितेश राणे यांनी शिवसेनेला आव्हान देण्याचे काम केले आहे. त्यामुळे आता त्यांनी आपल्यासोबत असलेल्या पोलिसांना बाजूला ठेवून घरी जाऊन दाखवावं, असे आव्हान वैभव नाईक यांनी दिले आहे. त्यामुळे हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

नारायण राणे यांना महाराष्ट्राची कमी पडली म्हणून त्यांनी केंद्राची सुरक्षा मागवली. अनेक भाजप नेत्यांनी केंद्राची सुरक्षा मागितली आहे. त्यामुळे कोण कोणाला भीत आहे हे जनतेला आणि महाराष्ट्राला माहित आहे, असा टोलाही वैभव नाईकांना लगावला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत संयमी पद्धतीने महाराष्ट्राचा कारभार सुरु आहे. परंतू शिवसेनेला जर कोणी हिनवत असेल तर त्याला त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल, असा इशाराही वैभव नाईकांनी दिला आहे. यावेळी नाईकांसोबत असलेले कार्यकर्तेही आक्रमक असल्याचे दिसून येत होते.

दरम्यान, आम्हाला कायदा आणि सुव्यवस्था खराब करायची नाही. ज्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत, त्याच पक्षाचे कार्यकर्ते मस्ती करत आहे. त्यांचेच नातेवाईक धिंगाणा घालत आहे. तर राज्यातील जनतेने कायदा सुव्यवस्थेबाबत कोणाकडून अपेक्षा ठेवावी, असे आमदार नितेश राणे यांनी म्हटले होते.

महत्वाच्या बातम्या-
आता जो येतो तो म्हणायला भारतात येतो, पण जातो फक्त गुजरातला; पवारांचा मोदींवर हल्लाबोल
इलेक्ट्रीक बाईक घेणारांनो सावधान! चार्जींगला लावलेल्या बॅटरीचा स्फोट झाल्याने अख्ख कुटुंब उद्ध्वस्त
राज ठाकरेंना सभेची परवानगी मिळो न मिळो, सभा होणारच; केंद्रीय मंत्र्यांचे राज ठाकरेंबद्दल मोठे वक्तव्य

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now