Share

Shivsena : मशाल चिन्हानेच शिवसेनेला पहिला खासदार दिला होता, वाचा ‘तो’ १९८९ चा भन्नाट किस्सा

uddhav thackeray

shivsena win first loksabha election on mashal symbol | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपणच खरी शिवसेना म्हणत चिन्हावर दावा ठोकला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाचा वाद आधी सर्वोच्च न्यायालयात गेला होता. पण त्यानंतर हा वाद निवडणूक आयोगाकडे गेला. पण त्यांनी जो निर्णय घेतला त्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गट या दोघांनाही धक्का बसला होता.

निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला. अंधेरी पुर्व विधानसभा पोटनिवडणुकीपुरता हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही गटांना वेगळे नाव आणि चिन्ह घ्यावे लागणार आहे. अशात उद्धव ठाकरे यांचे मशाल हे चिन्ह निवडणूक आयोगाने मान्य केले आहे. तसेच त्यांच्या पक्षाचे नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे असणार आहे.

याआधीही शिवसेनेने दुसऱ्या चिन्हांवरुन निवडणूका लढवल्या आहे. इतकंच नाही, तर त्यांनी त्यात यश देखील मिळवले आहे. मशाल हे चिन्ह कधीकाळी शिवसेनेचेच होते. तेव्हाच त्यांना पहिला खासदार मिळाला होता. मशाल या चिन्हावरच शिवसेनेला औरंगाबादमधून पहिला खासदार मिळाला होता.

१९८९ मध्ये औरंगाबादची लोकसभा निवडणूक होती. त्यावेळी औरंबादमध्ये शिवसेनेने मोरेश्वर सावे यांना उमेदवारी दिली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तेव्हा मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर तेव्हा मशाल या चिन्हावरच मतं मागितली होती. या चिन्हामुळेच शिवसेनेला पहिला खासदार मिळाला होता.

मशाल या चिन्हावर पहिला विजय मिळवल्यानंतर औरंगाबादमध्ये २०१९ पर्यंत कायम भगवा फडकत होता. फक्त १९९८ च्या निवडणूकीत शिवसेनेचा पराभव झाला होता. पण त्यानंतरही शिवसेनेने तिथे विजय मिळवून दाखवला होता. थोडक्यात लोकसभेच्या शिवसेनेच्या विजयाची मशाल तिथूनच पेटली होती.

१९९६ ची लोकसभा निवडणूक झाली तेव्हा धनुष्यबाण चिन्हावर प्रदीप जैस्वाल यांनी निवडणूक लढवली होती. त्या निवडणूकीत ते खासदार झाले होते. त्यानंतर १९९८ च्या निवडणूकीत मात्र शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. त्यानंतर २०१९ पर्यंत शिवसेनेने विजय मिळवला होता. पण २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत एमआयएमने या मतदार संघात विजय मिळवला.

महत्वाच्या बातम्या-
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची ‘मशाल’ पुन्हा पेटवणार विजयाची ज्वाला; पहा काय आहे शिवसेनेचा इतिहास
Shivsena : याआधीही धगधगत्या मशालीने घडवला होता इतिहास; ‘मशाल’ चिन्हासोबत सेनेचं नातं जुनंच
Uddhav Thackeray : धनुष्यबाण पुन्हा उद्धव ठाकरे गटाकडे जाणार? दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now