shivsena : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलेच राजकारणात सक्रिय झाले आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. शिंदे गटात घरानेशाहीला महत्त्वाचं देतं असल्याच सध्या अधोरेखित होतं आहे. आजी – माजी मंत्र्यांच्या मुलांना शिंदे गटात स्थान मिळत आहे.
हे सांगण्याच कारण म्हणजे, नुकतीच शिंदे गटाने युवासेनेची कार्यकारिणी जाहीर केली आहे. या कार्यकारणीत बहुतांश आमदार, मंत्र्यांच्या मुलांना संधी देण्यात आली आहे. मंत्री दादा भुसे, अर्जुन खोतकर, आमदार सदा सरवणकर, प्रकाश सुर्वे यांच्या मुलांचा युवासेनेत समावेश करून घेण्यात आला आहे.
विशेष बाब म्हणजे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासोबत काम करणाऱ्या चेहऱ्यांना शिंदेंच्या युवासेनेच्या कार्यकारिणीमध्ये जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॅप्टन अभिजीत अडसूळ यांची शिवसेना सचिवपदी नियुक्ती केली.
काल खुद्द मुख्यमंत्र्यांनी अभिजीत अडसूळ यांना नियुक्तीपत्र दिले. महत्त्वाची बाब म्हणजे, यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत देखील उपस्थित होते. यापूर्वी अडसूळ यांनी आमदार तसेच विभागप्रमुखपद भूषवले आहे. ते शिंदे गटाचे शिवसेना नेते व माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे चिरंजीव आहेत.
राज्यात शिंदे सरकार येताच काही दिवसांतच मुख्यमंत्र्यांनी नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली. याचबरोबर यात आनंदराव अडसूळ यांची पक्षाच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच याशिवाय अडसूळ हे शिवसेनेकडून 5 वेळा खासदार देखील झाले आहेत.
दरम्यान, यामुळे पुन्हा एकदा शिंदे गटातील घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित झाला आहे. अलीकडेच शिंदे गटाने युवासेनेची कार्यकारिणी जाहीर केली आहे. शिंदे गटाने उत्तर महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात तसेच राज्यभरात वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.