Share

eknath shinde : भाजपला नकोय शिंदे गटातील ‘हा’ नेता; शिंदेची झाली कोंडी, वाचा शिंदे – फडणवीस सरकारमध्ये नेमकं चाललंय काय?

Devendra Fadanvis Eknath Shinde

eknath shinde : एकनाथ शिंदे यांनी भाजपशी हातमिळवणी करून भाजपसोबत सरकार स्थापन केलं खरं..! मात्र असं असलं तरी देखील शिंदे आणि भाजपमधील नेत्यांमध्ये खटके उडताना पाहायला मिळतं आहे. यामुळे कुठ तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी होताना पाहायला मिळतं आहे.

हे सांगण्याचं कारण म्हणजे, शिंदे गटातील मुंबईचा एक नेता भाजपला नको असल्याचे दिसून येत आहे. यामुळे आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या पुढील अडचणींमद्धे वाढ होणार का? हे पहावे लागेल. आता शिंदे काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

वाचा नेमकं काय घडलंय?
काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती यशवंत जाधव यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. तर आता त्यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव यांनी शिंदे गटाला समर्थन दिलं आहे. जाधव यांचा शिंदे गटातील प्रवेश भाजपला खटलेला पाहायला मिळतं आहे.

हे सांगण्याच कारण म्हणजे, पत्रकारांनी भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांना जाधव यांच्या भ्रष्टाचाराची आता शुद्धी झाली का? असा सवाल विचारला. यावर उत्तर देताना शेलार यांनी म्हंटलंय की, ‘यशवंत जाधव आपल्याला नकोच आहेत.’ त्यामुळे शिंदे आता काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, पुढे बोलताना शेलार यांनी म्हंटलं आहे की, आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या भाजप हा शिंदे गटासोबत १५०चा आकडा पार करेल. पालिकेत झेंडा फडकविल्यानंतर आम्ही भाजप आणि शिवसेना मिळून सेवालय सुरू करू. मात्र, या ‘सेवालया’च्या दरवाजात यशवंत जाधवांसारख्या प्रवृत्तीचा एकही माणूस नसेल.’

गेल्या जानेवारीमध्ये माजी खासदार किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांनी कोट्यावधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप होता. भाजपने जाधवांवर मनी लॉन्ड्रिंगचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर जाधवांच्या घरावर छापेदेखील टाकण्यात आले होते. तर आता भाजपला जाधव सोबत नको आहेत. यावर शिंदे काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या
Toll: बापरे! समृद्धी महामार्गावर टोल भरताना वाहनचालकांचे कंबरडे मोडणार, टोलची रक्कम ऐकून डोळे फिरतील
Shinde Group : शिंदे गटात जाताच प्रताप सरनाईकांना ईडीचा मोठा दिलासा; लवकरच केसही बंद होणार? 
बायका परपुरूषांच्या संपर्कात येतील म्हणून ‘या’ पुरग्रस्त गावातील लोक घर सोडायला नाहीत तयार
amruta fadnavis : “ठाकरे सरकारमुळेच वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात येऊ शकला नाही”: अमृता फडणवीस
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now