गेल्या काही महिन्यांपूर्वीच बंडखोरी करत एकनाथ शिंदे ५५ पैकी ४० आमदारांना घेऊन सुरतमार्गे गुवाहाटीला गेले. यासोबतच १० अपक्ष आमदारही होते. या बंडखोरीमुळे राज्याचे वातावरण चांगलेच तापलेले होते. राजकीय वर्तुळात अनेक बदल बघण्यास मिळाले. शिंदे गटाने त्यांचाच गट खरी शिवसेना असल्याचा दावा केला. याबाबत ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.
या प्रकरणाचा अंतिम निर्णय येईपर्यंत निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवले आहे. शिवसेनेत दोन गट पडले होते. एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असे नाव देण्यात आले होते. शिंदे गटाचे निवडणूक चिन्ह ‘तलवार आणि ढाल’ तर ठाकरे गटाचे निवडणूक चिन्ह ‘धडकी मशाल’ असे जाहीर झाले.
सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी 14 फेब्रुवारीला होणार आहे. पण शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाणावर अधिकार कोणाचा? याबाबत निकाल १७ जानेवारीला सुनावणी होणार आहे. आता या निर्णयानंतर आता ठाकरे गट काय करणार यावर लक्ष लागले आहे.
शिंदे गटाच्या बंडामुळे आता शिवसेना कोणाची? हा निर्णय अद्याप निवडणूक आयोगाने अजुन दिलेला नाही. येत्या १७ जानेवारीला या बाबत सुनावणी होणार आहे. आता १७ जानेवारीला नेमका निकाल कोणाच्या बाजूने लागतो यावर सगळ्यांचे लक्ष लागले आहे. जर शिंदे गटाच्या बाजूने निकाल लागला तर ठाकरे गटाचे पुढचे पाऊल काय असेल? हे निवडणूक आयोगाच्या निकालावर अवलंबून आहे.
येत्या १७ जानेवारीला जर निकाल शिंदे गटाच्या बाजुने लागला तर ठाकरे गटाचा पुढील प्लॅन तयार आहे अशी माहीती मिळाली आहे. शिंदे गटाच्या बाजुने निकाल लागल्यास ठाकरे गट जनतेत जाऊन पक्षाचे चिन्ह आणि नाव विचारात घेऊन ठरवणार असल्याची माहिती मिळाली आहे. यासह निवडणूक आयोगाच्या विरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या देखील तयारीत आहे.
शिंदे गटाकडे आमदार- खासदारांची संख्या पुरेशी आहे आणि निवडनूक आयोग आमदार खासदारांच्या संख्येवरूनच निकालाची सुनावणी करण्याची शक्यता आहे. जर निकाल सादिक अली खटल्यानुसार लागला तर शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळणार असल्याचेही सांगितले जात आहे. या सगळ्याच बाबी लक्षात घेता ठाकरे गटाने तयारी केली आहे. आता लक्ष निवडणूक आयोगाच्या निकालाकडे लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
“गोपीचंद पडळकर हे स्वतः मंगळसुत्रचोर आणि पाकीटमार, त्यांना चोपल्याशिवाय राहणार नाही”
एकनाथ शिंदे हेच खरे शिवसेनाप्रमुख, उद्धव ठाकरेंचे पद बेकायदेशीर; निवडणूक आयोगात हायहोल्टेट ड्रामा
शिंदे गटात अंतर्गत बंडाळी; ‘या’ बड्या नेत्याने तडकाफडकी एकनाथ शिंदेंकडे दिला राजीनामा