एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर सोलापुराच्या सांगोला मतदारसंघात शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले शहाजी बापू पाटील हे चांगलेच चर्चेत आले. आमदार शहाजीबापू यांच्या ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल ओके एकदम,’ या वाक्याची सध्या राज्यभरात चर्चा रंगली आहे.
मात्र राजकीयदृष्ट्या पाहता आमदार शहाजीबापू यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला असल्याच बोललं जातं आहे. ठाकरे सरकारमधून बाहेर पडून शिंदे यांनी बंड केल्यानंतर अनेक आमदारांनी शिंदेंना समर्थन दिले.
त्यानंतर राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन होताच खासदार, नगरसेवक देखील शिंदे गटाकडे मोठ्या प्रमाणात वळू लागले. यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठे खिंडार पडले. मात्र आता पुन्हा उद्धव ठाकरे हे जोमाने मैदानात उतरले आहेत. शिंदे गटात सामील झालेल्या शहाजीबापूंना त्यांच्याच होमपीचवर घेरण्याची तयारी सध्या उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
यामुळे आता सोलापुराच्या सांगोला मतदारसंघात राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे यांनी सांगोल्यातच शहाजीबापू पाटील यांच्यासमोर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना उभे केले आहे. यामुळे येणाऱ्या काळात लक्ष्मण हाके आणि शहाजीबापू पाटील यांच्यात राजकीय लढत पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, येत्या रविवारी सांगोल्यात खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत हाके यांनी शिवसैनिकांचा भव्य मेळावा आयोजित केला असल्याच समजत आहे. याबाबत पत्रकारांशी बोलताना हाके यांनी म्हंटलं आहे की, ‘सांगोला तालुक्यातील प्रत्येक गावात प्रत्येक वस्तीवर आम्ही शिवसैनिक मोठ्या ताकदीने उभा करू.’
याचबरोबर माझ्यासमोरील मोठं आव्हान हे सांगोला तालुक्यातील प्रत्येक वाडी-वस्तीवर शिवसेनेचा कार्यकर्त्या उभा करणे आणि शिवसेनेची शाखा स्थापन करणे, असं लक्ष्मण हाके यांनी म्हंटलं आहे. यामुळे आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये हाके हे नेमकी कशी लढत देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
गोविंदांना आरक्षण देण्याच्या निर्णयाला श्रीकांत शिंदेंचा विरोध; मुख्यमंत्र्यांना जाहीर इशारा देत म्हणाले…
इंदूरीकर महाराज पुन्हा अडचणीत; भडकलेल्या गावकऱ्यांचा थेट पोलिस ठाण्यात ठिय्या
‘वर्षातून एकदा दहीहंडी फोडण्याऱ्या गोविंदांना आरक्षण देण्यापेक्षा रोज साहसी खेळ करणाऱ्या डोंबाऱ्यांना आरक्षण द्या’
Mumbai : दहीहंडी उत्सवादरम्यान मुंबईत मोठी दुर्घटना; चार मजली इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली; पहा व्हिडीओ