shivsena : ठाकरे गटाच्या गोटातून आणखी एक मोठी बातमी समोर येतं आहे. शिंदे गटात सामील होण्यासाठी धमक्या येतं असल्याचं ठाकरे गटातील नगरसेवकाने म्हंटलं आहे. यामुळे आता ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात आणखी वादाची ठिणगी पडली असल्याचं बोललं जातं आहे.
‘शिंदे गटात सामील व्हा, अन्यथा तडीपार करून एन्काऊंटर,’ पोलीस उपायुक्ताने धमकी दिल्याचा ठाकरे गटातील माजी नगरसेवकाचा गौप्यस्फोट केला आहे. थेट पत्रकार परिषद घेत ठाकरे गटातील माजी नगरसेवक एम. के. मढवी यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे.
वाचा नेमकं प्रकरण काय?
ठाकरे गटातील माजी नगरसेवक एम. के. मढवी यांनी पत्रकार परिषदेत म्हंटलं आहे की, ‘शिंदे गटात सामील न झाल्यास तडीपार करून आपला एन्काऊंटर करण्याची धमकी देत परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी १० लाख रुपयांची मागणी केल्याचा खळबळजनक गंभीर केला आहे.
पुढे बोलताना एम. के. मढवी यांनी म्हंटलं आहे की, ‘खोट्या गुन्ह्यात अडकवून तडीपार करण्याचा प्रयत्न सध्या शिंदे गट पोलिसांच्या माध्यमातून करत आहे.’ तर आता पानसरे यांची त्वरित बदली न केल्यास सहकुटुंब आत्महत्या करण्याचा इशारा मढवी यांनी दिला आहे.
मात्र माझ्या कुटुंबाच्या जीवाचं काही विचित्र झाल्यास त्यास पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जबाबदार असतील असं देखील ते म्हणाले. एम. के. मढवी यांच्या आरोपांवर मात्र पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
आपल्यावर तडीपारीची कारवाई होईल या भीतीने ते खोटे आरोप करत असल्यास पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली. मढवी यांच्यावर जुने गुन्हे दाखल असतानाच त्यांच्यावर यावर्षी देखील तीन अन्य गुन्हे दाखल झाले असल्यामुळे त्यांच्यावर तडीपारीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची देखील पानसरे यांनी माहिती दिली.
महत्वाच्या बातम्या
Buldhana: महाराष्ट्रात जंगलराज! मुल चोरीच्या संशयावरून तृतीयपंथीला बेदम मारहाण
Sangli: सांगलीत पालघरची पुनरावृत्ती! चार साधूंना बेदम मारहाण, धक्कादायक कारण आले समोर
सदावर्तेंना सुट्टी नाहीच! जामीन मिळताच सातारा पोलीस करणार उचलबांगडी, जाणून घ्या काय आहे प्रकरण
bjp : बारामतीत पवारांचा करेक्ट कार्यक्रम! भाजपने राष्ट्रवादीचा मोहराच फोडला, आक्रमक महिला नेत्याने हाती घेतलं कमळ