गुरुवारी यवतमाळ जिल्हा चांगलाच हदरला. यवतमाळ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तसेच शिवसैनिक सुनील नारायण डिवरे यांची सायंकाळी भांबराजा येथे घरातच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. डीवरे हे भांब राजा गावातील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तथा माजी सरपंच होते. यंदा त्यांची पत्नी अनुप्रिया डीवरे या सरपंच आहेत. (shivsena local leader sunil divare shoot dead)
तसेच या गुन्ह्यातील प्रमुख तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काही तासांतच अटक केली. पवन प्रभाकर सोननकर (२५), वैभव प्रभाकर सोननकर (२३), रोहित राजेंद्र भोपडे (२१) रा. भांबराजा या तिघांना लोहारा येथून गुरुवारी रात्री अटक केली. तर सुरेश चिंगोजी पात्रीकर हे पोलीस ठाण्यात शरण आले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली देशी पिस्टलही जप्त केली.
अखेर डीवरे यांच्या हत्येचे कारण समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तीन वर्षांपूर्वीच्या नेहरु विद्यालयातील अध्यक्ष निवडीच्या वादातून संचालकाचा खून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. भांबराजा येथील नेहरु विद्यालयाच्या अध्यक्ष निवडीवरून तीन वर्षांपूर्वी वैभव सोननकर, पवन सोननकर, रोहित भोपडे यांचा तीन वर्षांपूर्वी वाद झाला होता.
याबाबत यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रारही देण्यात आली होती. सदर प्रकरण सध्या न्यायालयात सुरू आहे. त्यावेळी मृतक सुनील डिवरे यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच काही महिन्यांपूर्वी ग्रामस्थांच्या तक्रारीवरून ग्रामपंचायतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबविली.
दरम्यान, या मोहिमेमध्ये किसन जयस्वाल यांचे घराचे अतिक्रमण काढले होते. सध्या डिवरे हे ग्रामपंचायत सदस्य होते तर पत्नी सरपंच आहे. त्यावरून सुनील डिवरे यांच्याशी किसन जयस्वालचा वाद झाला होता. आणि यातूनच डीवरे यांची हत्या झाल्याच बोलले जातं आहे.
तर दुसरीकडे या घटनेमुळे शिवसैनिक संतप्त झाले आहे. काल त्यांनी नागपूर-तुळजापूर मार्गावर रास्तारोको आंदोलन केलं. यावेळी काही ठिकाणी टायर जाळून काही वेळासाठी वाहतूक बंद करण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. या आंदोलनामुळे या मार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
महत्त्वाच्या बातम्या
मोठी बातमी! लतादीदींची प्रकृती बिघडली, पुन्हा ठेवण्यात आले व्हेंटिलेटरवर, डॉक्टर म्हणाले..
“बंडातात्यांच्या वक्तव्या पाठीमागचा बोलावता धनी दुसराच कुणीतरी”; कोण आहे तो?
राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित महिला पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल, कारण वाचून धक्का बसेल
…तर तुम्ही राजकीय संन्यास घ्या’, तिकीट नाकारलेल्या पार्सेकरांचे फडणवीसांना खुलं आव्हान