Share

…म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली; सत्तास्थापनेनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण

udhav thackeray

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त बोलताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(udhav thackeray)  यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. ‘आम्हाला गुलामाची वागणूक दिली. तुम्ही आम्हाला दिलेलं वचन मोडलं, त्यामुळेच आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीशी युती केली. पण, आम्ही तुमच्यासारखी सकाळी चोरुन नाही, तर संध्याकाळी शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने हजारो लोकांसमोर शपथ घेतली, असं ठाकरे यांनी म्हंटले आहे. (shivsena leader udhav thackeray criticize modi gov)

भाजप (bjp) टीका करताना ठाकरे म्हणाले की, “शिवसेनेची गेली 25 वर्ष भाजप सोबत युती होती. आपली 25 वर्ष युतीमध्ये सडली. माझं आजही तेच मत आहे. मी माझ्या मतावर ठाण आहे. बाळासाहेब म्हणायचे की राजकारण हे गजकर्णसारखं आहे, जेवढं खाजवावं तेवढं अधिक खाज येतं. तसे हे सगळे गजकर्णी, म्हणजे राजकारणातले, नाहीतर पुन्हा एकदा मथळा यायचा की मी त्यांना गजकरणी म्हटलं. मी त्यांना राजकारणाचं गजकरण आहे म्हणून मी बोलतोय.”

तसेच भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी हे इतर पक्ष साध्या निवडणुकांकडे देखील लक्ष देतात. अगदी मोठमोठे नेते प्रत्यक्ष निवडणूक लढत नसले तरी प्रत्यक्ष रिंगणात उतरून उमेदवारांना सर्व मदत करतात. तशी मदत आपल्याकडून होत नाही. मी माझ्यापासून सुरुवात करतो. तसं पाहिलं तर मी देखील गुन्हेगार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हंटले आहे.

“भाजपाने सोयीप्रमाणे काश्मिरात मेहबुबा मुफ्तींसोबत, बिहारमध्ये संघमुक्त भारत म्हणणाऱ्या नितिश कुमार यांच्यासोबत युती केली. मतांसाठी गोवंश बंदी दूर केली. सरकार पाडून आमदार फोडून तुम्ही सरकार स्थापन केले. असले हिंदुत्व आमचे नाही. शिवसेनेने मर्दासारखी उघडपणे शिवतीर्थावर काँग्रेस सोबत युती केली. दिवस उजाडण्याआधी शपथ घेतली नाही,” असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपाला टोले लगावले.

दरम्यान, “आपण खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी असं वागतो. म्हणजे आपण लोकसभा आणि विधानसभा ज्या जिद्दीने लढवतो तेवढ्या जिद्दीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढत नाही. माझ्यासह आपले नेते, मंत्री, जिल्हा प्रमुख त्या निवडणुकांकडे त्या पद्धतीने लक्ष देतात का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

तसेच भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी हे इतर पक्ष साध्या निवडणुकांकडे देखील लक्ष देतात. अगदी मोठमोठे नेते प्रत्यक्ष निवडणूक लढत नसले तरी प्रत्यक्ष रिंगणात उतरून उमेदवारांना सर्व मदत करतात. तशी मदत आपल्याकडून होत नाही. मी माझ्यापासून सुरुवात करतो. तसं पाहिलं तर मी देखील गुन्हेगार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हंटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
पुष्पा पाठोपाठ अल्लू अर्जुनचे हिंदीतील आणखी ६ चित्रपट बाॅलीवूडमध्ये धुमाकूळ घालणार, पहा यादी..
टाटा मोटर्सने वाढवले ​​उत्पादन, या वर्षी सर्व मोठ्या कंपन्यांना मागे टाकणार, पाहा कंपनीचा प्लॅन
बोनी कपूर यांनी शबाना आझमीसोबत केला डान्स; व्हिडिओ पाहून जान्हवी म्हणाली, पापा….
अंबानीच्या पोराचा साखरपुडा झाला; वाचा काय काम करतेय अंबानी कुटुंबाची सून क्रिशा शाह

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now