‘उद्या दुपारी १२ वाजता शिवबंधन बांधण्यासाठी मातोश्रीवर या,’ असा निरोप राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेना खासदार संजय राऊतांकडे छत्रपती संभाजीराजेंना देण्यासाठी निरोप पाठवल्याची बातमी आता समोर येत आहे. यामुळे आता संभाजीराजें उद्या (सोमवार) शिवबंधन बांधणार का? याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागले आहे.
शिवसेनेचं शिष्टमंडळ तासाभरापूर्वीच संभाजीराजेंच्या भेटीला हॉटेल ट्रायडंट येथे गेलं होतं. सुमारे पाऊण तास संभाजीराजेंशी सखोल चर्चा केली. याच दरम्यान शिवसेना नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा निरोप संभाजीराजेंना दिला असल्याची माहिती मिळत आहे. ‘संभाजीराजेंनी सेनेत पक्षप्रवेश करावा,’ असा निरोप मुख्यमंत्र्यांनी राऊतांकरवी संभाजीराजेंना दिला आहे.
याचा अर्थ शिवबंधन बांधले नाही तर शिवसेना पर्यायाचा विचार करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. संजय राऊत यांनीही शिवबंधनाची अट असल्याचे संभाजीराजेंना सांगितलं असल्याच समजत आहे. या फर्मानानुसार संभाजीराजेंनी सोमवारी दुपारी १२ वाजता शिवबंधन बांधावे, यावर ठाकरे ठाम राहिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यसभेच्या सहाव्या जागेसंदर्भात चर्चा करण्यासाठी हे शिष्टमंडळ संभाजीराजेंच्या भेटीला गेले होते. यामध्ये मोठ्या शिवनेना नेत्यांची उपस्थिती होती. यामध्ये खासदार अनिल देसाई, उदय सामंत, मिलिंद नार्वेकर हे संभाजीराजेंच्या भेटीला गेले होते.
दरम्यान, काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात शिवसेना संभाजीराजे छत्रपतींना राज्यसभेसाठी उमेदवारी देणार असल्याच्या उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं. यातच आता संभाजीराजे छत्रपती शिवसेना पुरुस्कृत उमेदवार असतील अशी माहिती समोर आली आहे. तर आता उद्या संभाजीराजे शिवबंधन बांधणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
तर दुसरीकडे ‘संभाजीराजे असोत की, आणखी कुणी, मतं शिवसेनेच्याच उमेदवाराला’, शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं आहे. काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी संभाजी राजे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठींबा असल्याच जाहीर केलं होतं. मात्र आता पवारांनी आपली भूमिका बदलल्याच पाहायला मिळत आहे.
काल याबाबत माध्यमांशी बोलताना शरद पवारांनी भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना पवार म्हणाले की, ‘संभाजीराजे असोत की, आणखी कुणी, राष्ट्रवादी काँग्रेसची शिल्लक राहणारी मतं शिवसेनेच्या उमेदवाराला दिली जातील,’ असं त्यांनी स्पष्टच सांगितलं. शरद पवार म्हणाले की, ‘दोन वर्षापूर्वी आमच्याकडे एकच जागा येत होती. मुख्यमंत्र्यांना सांगितलं आम्हाला दोन जागा हव्या. मी आणि फौजिया खान. मुख्यमंत्री म्हणाले तुम्ही असाल तर आम्ही देतो. पण पुढच्यावेळी दोन जागा आम्हाला दिल्या पाहिजे. ते आम्ही मान्य केलं.’
तर आता ‘आमच्याकडील शिल्लक मते आम्ही शिवसेनेच्या उमेदवाराशिवाय कुणाला देऊ शकत नाही. त्यांनी जे नाव दिलं त्या नावाला आम्ही पाठिंबा देणार. मग ते संभाजीराजे असो की इतर कुणी असो,’ असं पवारांनी स्पष्टच सांगितलं. ‘शिवसेना जो उमेदवार देईल ते त्याला आम्ही मतदान करू,’ असं पवारांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या
अयोध्येत विरोध हा भाजपचाच ट्रॅप? पुण्यातल्या सभेत राज ठाकरेंनी योगींना बनवलं टार्गेट, तर फडणवीस…
‘महाराष्ट्रात राहता तर मराठी यायला पाहिजे’; पत्रकाराने उर्फी जावेदचा केला पाणउतारा
‘हे होणारच होतं… भूमिका बदलली नाही ते पवार साहेब कसले??,’ राणे थेट पवारांवर बरसले
ब्राम्हण संघटनांनी घेतली शरद पवारांची भेट, केल्या ‘या’ तीन मागण्या; शरद पवार म्हणाले…