Share

…तर मी राजीनामा देऊन टाकेन; तानाजी सावंत यांनी केलं जाहीर आव्हान, वाचा नेमकं काय म्हंटलंय?

tanaji sawant
शिंदे गटातील नेते सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. अशातच राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे चर्चेत आहेत. नुकतीच पुण्यातील ससून रुग्णालयाला आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी भेट दिली. त्यावेळी तेथील डॉक्टरांना त्यांनी सुनावले. रुग्णालयातील औषधांच्या तुटवड्यावरून त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.

यावेळी “तुम्ही ज्या हाफकिन माणसाकडून औषध घेत आहात ते आधी बंद करा,” असे ते म्हणाले. हे वाक्य ऐकताच डॉक्टरांना हसू आवरले नसल्याचे या व्हायरल झालेल्या बातमीत म्हटले आहे. त्यानंतर त्यांच्या पीएने त्यांच्या कानात हळूच सांगितले की, हाफकिन नावाचा कोणी माणूस नसून ती एक शासकीय संस्था आहे. त्यानंतर मंत्र्यांनी तिथून पळ काढला.

आरोग्य संस्थांबद्दलचे त्यांचे अज्ञान समोर आले आहे. त्यामुळे ते सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल होत आहेत. अखेर आरोग्य मंत्र्यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे. “मी मुर्ख आहे का ? मी डॉक्टर आहे. मी पिएचडी होल्डर आहे तसेच रॅकर आहे. आयुष्यभर घासलेलं आहे. मीडिया मुद्दाम टार्गेट करुन दाखवत आहे. जनतेची दिशाभूल केली जात आहे” असं सावंत म्हणाले.

पुढे स्पष्टीकरण देताना सावंत यांनी म्हंटलं आहे की, ‘हापकिन कोण आहेत हे मला माहिती नसल्याचे मीडियाने दाखवले. मी ग्रामीण भागातील आहे. समजा, मी जर एखादी गोष्ट ग्रामीण भागातील म्हणालो, तर मीडिया माझ्या मागे फिरणार नाही, असं सावंत यांनी म्हंटलं आहे.

‘मी उच्चशिक्षित आहे. एकदा मी किती संस्था चालवतो, किती कारखाने चालवतो, किती दर्जेदार आहेत याची माहिती घ्या. मी काय तुम्हाला अंगठाछाप मंत्री वाटलो का? असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला आहे. ‘मी इतका वेडा आहे का? मी कुठे बोललो हे दाखवून द्या. हाफकिन माणसाकडून औषधं घ्यायची नाही असं म्हणालो असेल तर आत्ता राजीनामा देऊन टाकेन,” असं आव्हान सावंत यांनी केलं

जाणून घ्या हाफकीन नावाचा इतिहास..!

खरंतर मुंबईमध्ये हाफकीन नावाची एक संस्था आहे. १० ऑगस्ट १८९९ रोजी डॉ. वाल्डेमार मोर्डेकइ हाफकिन यांनी ‘प्लेग रिसर्च लॅबोरेटरी’ नावाचे बॅक्टेरियोलॉजी संशोधन केंद्र म्हणून त्याची स्थापना केली. या संस्थेला हाफकीन आडनाव असलेल्या शास्त्रज्ञाच्या नावावर नाव देण्यात आले आहे.

१९२५ मध्ये या संस्थेचे “बॉंबे बॅक्टेरियोलॉजी लॅबोरेटरी” हे नाव बदलून “हाफकिन इन्स्टीट्यूट” असे ठेवण्यात आले. मात्र, आरोग्यमंत्र्यांनी या संस्थेला चक्क कुणीतरी माणूस समजले आहे. त्यामुळे त्यांचे अज्ञान समोर आले आहे.

महत्वाच्या बातम्या

MNS : राज्य हादरले! मनसेच्या बड्या नेत्याला चाकूने भोसकून ठार मारले; हत्येचा थरार ऐकून अंगावर काटा येईल
मुख्यमंत्र्याच्या सभेला जेवढी जास्त गर्दी तेवढे जास्त पैसे मिळतील; मंत्री संदीपान भुमरेंच्या मुलाचे लोकांना आवाहन
त्यांना हाफकिन पण दलाल वाटला..; तानाजी सावंताच्या अज्ञानावरून आदित्य ठाकरेंनी झाप झाप झापले
“तू ठाकरे है, तो मैं भी….”, नवनीत राणा पुन्हा उद्धव ठाकरेंवर बरसल्या, वाचा नेमकं काय म्हंटलंय?
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now