shivsena : सत्ता जाताचं अनेकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची साथ सोडली. यामुळे उद्धव ठाकरेंना अनेक धक्के बसले. उद्धव ठाकरेंच्या अगदी जवळच्या व्यक्तींनी शिंदे गटात जाण्यास प्राधान्य दिलं आहे. यामुळे महाराष्ट्रात शिंदे गटाच वजन वाढलेले पाहायला मिळत आहे.
मात्र असं असलं तरी देखील काही निष्ठावान अजूनही उद्धव ठाकरेंसोबत आहेत. या कठीण काळात देखील काही शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबत ठामपणे उभे आहेत. हे सांगण्याच कारण म्हणजे, उद्धव ठाकरे यांच्या एका समर्थकाने तर थेट रक्तानेच पत्र लिहिलं आहे.
शिवसेना एसटी कामगार सेनेचे पदाधिकारी मनोज गवळी यांनी थेट उद्धव ठाकरेंना रक्ताने पत्र लिहिले आहे. गवळी यांनी स्वत:च्या रक्ताने निष्ठापत्र लिहिले असून ते पत्र थेट उद्धव ठाकरेंना पाठवलं आहे. विशेष बाब म्हणजे, या पत्राची उद्धव यांनीही दखल घेतली आहे.
उद्धव ठाकरेंनी गवळी यांना भेटीचं निमंत्रण पाठवलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे यांच्याशी थेट संपर्क साधत गवळी यांना थेट मातोश्रीवर बोलावून घेतले. मातोश्रीवर आल्यानंतर ठाकरे यांनी गवळी यांची विचारपूस केली.
दरम्यान, मातोश्रीवर आल्यानंतर ठाकरेंनी गवळी यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. सध्या गवळी यांच्या पत्राची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. सध्या राजकीय परिस्थितीत शिवसेना चांगलीच अडचणीत सापडली आहे. उद्धव ठाकरेंसमोरील अडचणी वाढलेल्या पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या
Buldhana: महाराष्ट्रात जंगलराज! मुल चोरीच्या संशयावरून तृतीयपंथीला बेदम मारहाण
Sangli: सांगलीत पालघरची पुनरावृत्ती! चार साधूंना बेदम मारहाण, धक्कादायक कारण आले समोर
सदावर्तेंना सुट्टी नाहीच! जामीन मिळताच सातारा पोलीस करणार उचलबांगडी, जाणून घ्या काय आहे प्रकरण
bjp : बारामतीत पवारांचा करेक्ट कार्यक्रम! भाजपने राष्ट्रवादीचा मोहराच फोडला, आक्रमक महिला नेत्याने हाती घेतलं कमळ






