‘शिवसेनेच्या कोट्यातील एक जागा आम्ही संभाजीराजे छत्रपतींना देण्यासाठी तयार झालो. तो छत्रपतींचा सन्मान राखण्यासाठी त्यांच्या घराण्याचा सन्मान राखण्यासाठी. यापेक्षा अधिक शिवसेना काय करु शकते? हे सांगा,’ असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
राऊत याबाबत माध्यमांशी बोलत होते. संभाजीराजेंना डावलून शिवसेनेने संजय पवारांना ही राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. संभाजीराजेंना शिवसेनेने डावल्यानंतर राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि संजय राऊत हेच याला कारणीभूत असल्याचे सांगत मराठा संघटनांच्या प्रतिनिधींनी संताप व्यक्त केला.
मराठा क्रांती मोर्चा व छावा संघटना आक्रमक झाल्या आहे. ‘संजय राऊत यांचा सत्तेचा माज महाराष्ट्रातील शिव प्रेमी जनता उतरवेल,’ असा इशारा छावा संघटनेने दिला आहे. यावर आता राऊत यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. राऊत यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहे.
याबाबत बोलताना राऊत म्हणाले, संभाजीराजेंना शिवसेनेची ४२ मते देण्यासाठी तयार होतो. ही जागा शिवसेनेची आहे, तुम्ही शिवसेनेचे उमेदवार व्हा ही आमची अट नव्हती तर भूमिका होती.’ मात्र आता संभाजीराजे छत्रपती यांचा विषय आमच्या दृष्टीनं संपलेला आहे, असं राऊत यांनी स्पष्टच सांगितलं.
दरम्यान, 2024 ला तुम्हाला याची राजकीय किंमत मोजावी लागेलच असा इशारा मराठा क्रांती मोर्चानं राऊतांना दिला आहे. यावर बोलताना राऊत म्हणाले, या प्रकरणात माझा व्यक्तीगत काय संबंध आहे? शिवसेनेचा काय संबंध आहे? असे सवाल राऊत यांनी उपस्थित केले.
तसेच ‘शिवसेनेच्या कोट्यातील जागा आम्ही संभाजीराजेंना देण्यास तयार झालो. राजघराण्याचा, संभाजीराजेंचा सन्मान ठेवला यापेक्षा आम्ही काय करू शकत होतो,’ असं राऊत यांनी म्हंटलं आहे. दरम्यान आता राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी सुरू असलेल्या चर्चाना पूर्णविराम मिळाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
‘राजा’ने कर्तृत्ववान सरदारांचा सन्मान राखला पाहिजे; वसंत मोरेंनी पोस्ट केलेल्या पत्राने चर्चांना उधान
सलग दोन वर्षे अर्जून तेंडूलकर संघाबाहेर; अखेर सचिनने मौन सोडत दिली प्रतिक्रीया, म्हणाला..
मोठी बातमी! अभिनेता पुष्कर जोगच्या आईवर गुन्हा दाखल, शिक्षण क्षेत्रात केला कोट्यावधींचा घोटाळा
भारतीय मुस्लिमांचा मुघलांशी काहीही संबंध नाही, पण मुघलांच्या बायका कोण होत्या? ओवेसींचा सवाल