shivsena : राज्यात सत्तांतर झालं आहे. शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झालं आहे. तर दुसरीकडे शिवसेना लागलेली गळती थांबविण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विविध प्रयत्न करतं आहे. पक्षाला सावरायच कसं? पक्षाची नव्याने उभारणी कशी करायची? असे अनेक प्रश्न सध्या उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या समोर उभे आहेत.
पक्षाला लागलेली गळती थांबविण्यासाठी शिवसेनेने खासदार, आमदार, नगरसेवकांपासून पंचायत समिती सदस्यांसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून एकनिष्ठतेचे प्रतिज्ञापत्रं घेण्यास सुरुवात केली आहे. यामुळे पक्ष सावरण्यास मदत होईल असे उद्धव ठाकरेंना वाटतं आहे.
मात्र चित्र काहीस वेगळं पाहायला मिळतं आहे. एकनिष्ठ असल्याचं ज्यांनी प्रतिज्ञापत्र दिलं, तेत शिंदे गटात सामील झालेत. यामुळे आता उद्धव ठाकरेंसमोर नवीन आव्हान उभे राहिले आहे. आता नेमकं काय करावं? असा मोठा प्रश्न सध्या शिवसेना पक्षश्रेष्ठींसमोर उभा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे गुहागरमधील 6 पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला असल्याची माहिती मिळाली आहे. गुहागरमधील शिवसेनेचे चार पदाधिकारी आणि दोन सरपंच शिंदे गटात दाखल झाले. गुहागरमधील युवासेना प्रमुख देखील शिंदे गटात सामील झाल्याच पाहायला मिळत आहे.
दरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्यासोबत घेतलेल्या भेटीचा फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरलं होतं आहे. यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या कोकणातील राजकारण तापलं आहे. शिंदे गटातील रामदास कदम यांच्या दौऱ्यावर ही राजकीय घडमोड घडली असल्याची माहिती समोर आली आहे.
मात्र असं असलं तरी देखील दुसरीकडे मात्र शिवसेनेत घरवापसीचे देखील प्रमाण वाढलं असल्याचं सकारात्मक चित्र आता पाहायला मिळतं आहे. यामुळे आगामी निवडणूक जनता शिवसेनेच्या कोणत्या गटाला पाठिंबा देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या तरी ठाकरे गट आणि शिंदे गट निवडणुकांची कसून तयारी करतं आहेत.